Press conference in Utkarsha Rupwate : आमच्या मतदारांना आम्ही भेटायचं नाही का ? ही लोकशाही आहे. कुणाला भेटलं की तुम्ही छुपा पाठिंबा म्हणून आरोप करणार असं कसं? अशा शब्दांत शिर्डी लोकसभेच्या (Shirdi Lok Sabha) वंचितच्या (Vanchit Aghadi) उमेदवार उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) यांनी छुपा पाठिंबा यावरून होणाऱ्या आरोपांना उत्तर दिलं आहे. त्या पत्रकारांशी बोलत होत्या. तसंच, मी विखे यांनाही भेटले आणि ते माझे मतदारही आहेत. त्यामुळे त्यांचं सहकार्य मी का घेऊ नये ? प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
वंचितला धक्का! आंबेडकरांचे आदेश धुडकावत जिल्हाध्यक्ष महाविकास आघाडीसोबत
भेट घेण्यात काय गैर आहे
कपील पाटील हे तत्वांनी चालणारे नेते आहेत. त्यांना जर वाटत असेल उत्कर्षा चांगलं काम करेल तर त्यांनी पाठिंबा दिला असेल. मग लगेच मी बी टीम आहे असा आरोप करायचा? हे चूक आहे. कारण ध्येय वेडेपणाने काम करणारे जे लोक आहेत त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला असेल तर त्यामध्ये काय गैर आहे असं म्हणत बी टीम म्हणून होणाऱ्या टीकेला उत्कर्ष रुपवते यांनी यावेळी उत्तर दिलं आहे.
आम्हाला बी टीम म्हणणारे वाघचौरे 2019 ला कुणाची बी टीम होते?, रुपवतेंचा हल्लाबोल
दबावगट निर्माण करण करण
सध्या पत्रकारांनाही मोठं दडपण आहे. आपण अनेक घटना पाहिल्या की विरोधात लिहलं तरी पत्रकारांना त्याचा त्रास झाला आहे. मात्र, येणाऱ्या काळात याबाबत आपल्याला काय करता येईल याचा विचार नक्की करावा लागेल अस म्हणत रुपवते यांनी एखादा दबाव गट निर्माण करता येईल का ? असाही प्रश्न यावेळी उपस्थित केला. तसंच, केंद्र सरकारपर्यंत हा मुद्दा घेऊन जाण महत्वाचं आहे असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.