Download App

अहमदनगर जिल्ह्यात 2 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू, जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता व सार्वजनिक सुरक्षा अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ (Siddharam Salimath) यांनी प्रतिबंधात्मक आदेश (Restraining order) लागू केले आहेत. सालीमठ यांनी प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये २० जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेत. या आदेशानुसार, प्रतिबंधात्मक कालावधीत सभा घेण्यास, शस्त्रे बाळगण्यास मनाई केली आहे. मिरवणूका, सभा, रॅली काढण्याची परवानगी देण्याचे पोलिस अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत.

नरेंद्र फिरोदिया यांनी कला-संस्कृतीला न्याय दिलाय, संजय बनसोडे यांचे गौरवोद्गार 

या आदेशात शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणं, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे जवळ ठेवणे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयचाी किंवा फेकायची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे यासाठी मनाई करण्यात आली आहे. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजवणे, ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जशाच्या तसा ऐकवणारे उपकरण संच वापरणे किंवा वाजवणे यासाठीही मनाई केली आहे.

सोशल मीडियाच्या जगात लाईव्ह मनोरंजन अन् रंगमंचाचे महत्त्व नव्या पिढीला पटवून देणे गरजेचे – नरेंद्र फिरोदिया 

तसेच सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोहोचेल किंवा शांतता धोक्यात आणणारी कोणतीही कृती करणे किंवा आवेशपूर्ण भाषणे, हावभाव करणे किंवा सोंग आणने तसेच तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार कऱणे किंवा त्यांचा प्रचार करणे, सार्वजनिक आणि खाजगी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास व पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यता आली आहे.

शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे अशांना हे आदेश लागू होणार नाहीत. तसेच प्रेतयात्रा, धार्मिका कार्यक्रम, धार्मिक मिरवणूका, विवाह समारंभ, विवाह मिरवणूका हे कार्यक्रम, सभा घेण्यास किंवा मिरवणूका काढण्यासाठी ज्यांनी संबंधित पोलीस निरीक्षक तथा सहायक पोलीस निरीक्षक यांच्याकडून रीतसर परवानगी घेतली, अशा व्यक्तींना हा आदेश लागू होणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

follow us