अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची बदली, आता पुण्यात मोठी जबाबदारी

  • Written By: Published:
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची बदली, आता पुण्यात मोठी जबाबदारी

Siddharam Salimath Collector, Ahilyanagar has been posted as Commissioner, Sugar Pune:
IAS Officer Transfer : राज्य सरकारकडून आयएएस अधिकाऱ्यांच्या (IAS Officer Transfer) बदल्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारी नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. अहिल्यानगरचे ( Ahilyanagar) जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ (Siddharam Salimath) यांची बदली झाली आहे. आता ते साखर आयुक्त असणार आहे. पण त्यांच्या जागी नवी नियुक्ती करण्यात आलेली नाही. सालीमठ हे दोन वर्ष अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी होते. त्या काळात अनेक नवीन उपक्रम त्यांनी राबविले.

म्युच्यूअल फंड ‘एसआयपी’त भूकंप! जानेवारीत तब्बल 61 लाख लोकांच्या गुंतवणुकीला ब्रेक; कारण काय?

कोकण विभागाचे विभागीय आयुक्त राजेश देशमुख यांची मुंबईत बदली झाली आहे. ते राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त म्हणून काम पाहतील. तर नयना गुंडे यांची नाशिक आदिवासी विकास आयुक्तपदावरून पुण्यात महिला व बालकल्याण आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

Video : “बेगडी शरद पवारांची बेगडी लेक, त्यांच्या मतदारसंघात…”, हाकेंची घणाघाती टीका

विमला आर या आता नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आणि सचिव असणार आहेत. त मुंबईत समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक होत्या. मिलिंदकुमार साळवे हे भंडारा येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी असणारक आहेत. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे हे सोलापूर महानगरपालिकेचे नवे आयुक्त असणार आहे. तर महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या नाशिक आयुक्त यांची नाशिकमध्येच आदिवासी विकास आयुक्त म्हणून बदली झाली आहे. तर गडचिरोलीचे सहायक जिल्हाधिकारी राहुल कुमार मीना यांची लातूर झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube