म्युच्यूअल फंड ‘एसआयपी’त भूकंप! जानेवारीत तब्बल 61 लाख लोकांच्या गुंतवणुकीला ब्रेक; कारण काय?

Mutual Fund SIP Investment : शेअर बाजाराची स्थिती (Share Market) सध्या फारशी चांगली दिसत नाही. गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये बुडाले आहेत. अशात आता गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील (Mutual Fund) विश्वासही कमी होत चालला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार SIP रोखून धरत आहेत. मिड कॅप फंड आणि स्मॉल कॅप फंडाबाबत मोहभंग होऊ लागला आहे. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण जानेवारी 2025 मध्ये तब्बल 61 लाख लोकांनी एसआयपीला ब्रेक लावला आहे. म्हणजेच एसआयपीत पैशांची गुंतवणूक बंद केली आहे.
तसं पाहिलं तर शेअर मार्केटमध्ये कायमच अनिश्चितता असते. त्यातही कमी धोका असणाऱ्या म्युच्युअल फंडात गुंतवणुकीकडे लोकांचा कल होता. शेअर मार्केटच्या तुलनेत म्युच्युअल फंडात रिस्क कमी असते असेही मानले जाते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत स्मॉल आणि मिड कॅप फंड लाल निशाणीवर आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. बाजारात विक्रीचा सिलसिला जोरात सुरू आहे.
शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर वाचा; अर्ध्या किमतीत मिळतोय टाटा समूहाचा शेअर
तब्बल 61 लाख एसआयपी कॅन्सल
मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार एसआयपी स्टॉपेज रेशोत वाढ दिसून आली आहे. एसआयपी बंद करणाऱ्या लोकांच्या संख्येत 82.73 टक्के वाढ झाली आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत ही वाढ खूप जास्त आहे. जानेवारी महिन्यात एसआयपी बंद करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या 61.33 लाख होती. डिसेंबर 2024 या महिन्यात 44.90 लाख लोकांनी एसआयपी बंद केली होती. या तुलनेत हा आकडा जास्तच आहे. एसआयपी इन फ्लोमध्ये सुद्धा घसरण दिसून आली. जानेवारी महिन्यात एसआयपी इन फ्लो 26 हजार 400 कोटी रुपये होता. डिसेंबर 2024 या महिन्यात हाच फ्लो 26 हजार 459 कोटी रुपये होता.
कारणही समजलं
जानेवारी महिन्यात 61 लाख लोकांनी एसआयपीतील गुंतवणूक बंद केली. यामुळे एसआयपी इनफ्लोमध्ये फारशी घसरण झालेली नाही. रिपोर्टनुसार म्युच्यूअल फंड इंडस्ट्रीसाठी काम करणारी संस्था AMFI सांगितले की एसआयपी खात्यात गुंतवणूक थांबण्याचे मुख्य कारण RTAs दरम्यान डाटा रिंकसाइल करणे हे आहे. यामुळे लाखो खात्यांत सुधारणा झाली.
ट्रम्प यांचा दणका.. कंगाल झाले शेअर बाजारातील महारथी, 40 दिवसात बुडाले हजारो करोडो रुपये