Ahmednagar Name Change Petition Against : शहराच्या नामांतराचा विषय काही सरकारची पाठ सोडताना दिसत नाही. यामध्ये काही काळापूर्वी औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादे धाराशिव असं नामांतर करण्यात आलं. त्यानंतर लगेच चर्चेत आला तो अहमदनगर शहराच्या नामांतराचा विषय. दरम्यान, अहमदनगर (Ahmednagar) नामांतराला विरोध करणारी जनहित याचिका मुबंई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य सरकारने या नामांतरास मंजुरी दिली असली तरी अद्याप केंद्र सरकारची मान्यता घेणं गरजेचं आहे.
तारीखही पडली गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेच्या 202 गाड्या सोडणार,या तारखेपासून होणार बुकिंग सुरू
राज्यातील महायुती सरकारने अहमदनगर शहराचंही नामांतार अहिल्यानगर करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी येथील कार्यक्रमातूनच याबाबतची घोषणा केली होती. त्यानंतर, राज्य सरकारने यासंदर्भातील निर्णयही घेतला. दि. 13 मार्च रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहिल्यानगर नामांतरास मान्यताही देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मात्र, याप्रकरणी आता सरकारची डोकेदुखी आणखी वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण, या नामांतराला विरोध होत असून त्याबाबत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून त्याला तारीखही पडली आहे.
अहमदनगर शहराचं नाव बदलण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधी, नागरिक व संघटनांनी अनेक दिवसांपासून केलेली आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडून माहिती मागवण्यात येऊन अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाचा ठराव देखील राज्य शासनास प्राप्त झाला होता. त्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार हे नामकरण करण्याची शिफारस करण्यात आली असून केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा, तालुका तसंच महानगरपालिका यांच्या नामांतरणाची कार्यवाही महसूल व नगर विकास विभागाकडून करण्यात येईल. मात्र, तत्पूर्वीच या नामांतराविरुद्ध याचिका दाखल झाली आहे.
अहिल्यानगर नावाची घोषणा पूजा खेडकरांच्या अडचणीत आणखी वाढ; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगही करणार तपास
अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुबंई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, अर्शद शेख आणि पुष्कर सोहोनी यांनी ही याचिका दाखल केली असून याची पहिलीच सुनावणी ही 25 जुलै रोजी होणार आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या अहमदनगर येथील चौंडी येथे आहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यानगर नावाची घोषणा केली होती. त्यानंतर, अहमदनगर महापालिकेच्या प्रशासकांनी देखील तसा ठरावं पाठवला होता. त्यामुळे राज्य सरकारने मंत्रिमंडळात अहिल्यानगर नावाच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून सध्या हे प्रकरण केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.