Ahmednagar Crime News : अहमदनगर शहरातील अत्यंत वर्दळीचा परिसर असलेल्या एका भागात काही तरुणांचा वाद होतो. या वादातून एक राजकीय पदाधिकारी त्याच्या कार्यकर्त्यांसह दुसऱ्या एका राजकीय व्यक्तीची भर चौकात हत्या करतो. अगदी सिनेमात घडतात. असे या हत्याकांडाने नगर शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे समोर आलंय. दरम्यान त्या रात्री नेमकं काय घडलं होत? ते हत्याकांड कसं व कोणत्या कारणामुळे घडलं? हे आपण सविस्तर जाणून घेऊ… ( Pune Mulashi pattern recreate in Ahmedngar Crime Story what’s happened at that day )
बच्चू कडूंचा मोठा डाव! मंत्रिपदावरील दावा सोडला पण नव्या मागणीनं CM शिंदेंपुढे वाढला पेच
अहमदनगर शहरातील एकविरा चौक परिसरामध्ये 15 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास काही लहान मुलांचे भांडण झाले होते. ही भांडणे मिटवण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेले अंकुश चत्तर हे तिथे गेले व त्यांनी ही भांडणं मिटवत सर्व मुलांना घरी जायला सांगितले. त्याचवेळी तेथे आलेल्या राजू फुलारी या इसमाने अंकुश यांना आपल्याला तुझ्याशी काही ‘बोलायचे आहे’, असे सांगून थांबवून ठेवले.
‘Baipan Bhaari Deva’ने तिसऱ्या आठवड्यात ओलांडला ५० कोटींचा टप्पा, एकूण कलेक्शन तब्बल…
हे सगळं सुरु असताना त्याठिकाणी दोन दुचाकी आणि एक चारचाकी गाडी आली व यामधून काही तरुण उतरून त्यांनी थेट अंकुश चत्तर यांच्यावर हल्ला केला. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करणाऱ्या तरुणांच्या हातात लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपचे तुकडे, गावठी कट्टा देखील असल्याची माहिती समोर आलं. दरम्यान या टोळक्याच्या हल्ल्यात अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले.
त्यांना मारहाण सुरु असताना भाजपचा एक पदाधिकारी तेथे आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अंकुश चत्तर यांच्याजवळ येऊन ‘हा संपला का पाहा रे, नसेल संपला तर त्यास संपवून टाका’, असे म्हणत त्याने देखील डोक्यात लोखंडी रॉड अंकुश यांना मारला. यानंतर ते सगळे तिथून निघून गेले. पण अंकुश हे अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले होते. तर अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या या याठिकाणावर असा धक्कादायक प्रकार घडल्याने नागरिक प्रचंड भीतीमध्ये वावरत होते.
दरम्यान या हल्ल्यांनंतर जखमी अंकुश यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मारहाण करणारा व मारहाण झालेला व्यक्ती या दोघांना राजकीय पार्श्वभूमी असल्याने रुग्णालयाबाहेर कार्यकर्ते मोठ्याप्रमाणावर गोळा झाले. पोलिसांनी देखील रुग्णालयाजवळील बंदोबस्त वाढवला. रुग्णालायात उपचारादरम्यान अंकुश यांचा मृत्यू झाला. या हत्याकांडाचे गांभीर्य ओळखून व परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी पोलिसांनी आपली यंत्रणा अलर्ट केली. अवघ्या 48 तासांत हत्याकांडातील आरोपींच्या विदर्भातून मुसक्या या आवळल्या.
आरोपींना अटक करण्यात आली असली तरी गेल्या काही दिवसांमध्ये अहमदनगर शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अस्तित्वातच राहिलेली नाही. जिल्ह्यात पोलिसांचा धाक हा संपलेला दिसतोय. कोयते, दांडके, सत्तुर आणि तलवारी दिवसाढवळ्या नगरमधील चौकांमध्ये नाचताना दिसतायत तर यातूनच शहरातील रस्त्यांवर लोकांचे मुडदे पडतायत. सिनेमांना लाजवेल असे धक्कादायक कृत्य नगर जिल्ह्यात सुरु आहे. मात्र पोलीस प्रशासन सध्या गुन्हेगारीला आळा घालण्याऐवजी दुचाकीधारकांच्या पावत्या फाडण्यात व्यस्त आहे. असा आरोप नागरिक करत आहेत. मात्र असेच सुरु राहिल्यास पुण्यातील मुळशी पॅटर्नची आवृत्ती नगरमध्ये सुरु होते कि काय? अशी भीती नागरिकांना वाटू लागली आहे.