‘Baipan Bhaari Deva’ने तिसऱ्या आठवड्यात ओलांडला ५० कोटींचा टप्पा, एकूण कलेक्शन तब्बल…

‘Baipan Bhaari Deva’ने तिसऱ्या आठवड्यात ओलांडला ५० कोटींचा टप्पा, एकूण कलेक्शन तब्बल…

Box Office Collection: सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ (Box Office Collection) घालत असलेला ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) या सिनेमाचा गजर ऐकायला मिळत आहे. या सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरशः कल्ला घालत असल्याचे दिसून येत आहे. या सिनेमात ६ बहिणींची कथा दाखवण्यात आली असल्याचे सदसित आहे. (Marathi Movie)  त्यांनी मांडलेली मंगळागौर चाहत्यांना सगळ्यांनाच भुरळ घालत असल्याचे दिसून येत आहे. या सिनेमाचे तिकीट बारीवर चांगलच गल्ला कमावत असल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Times Mirror (@thepunemirror)


‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाने आता ५० कोटींची मोठी कमाई केली आहे. नुकताच या सिनेमाच्या कमाईचा नवा आकडा देखील समोर आला आहे. (Kedar Shinde) ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाने केवळ चाहत्यांचीच पसंती मिळवली नाही, तर बॉक्स ऑफिसवर देखील मोठी कामगिरी केली आहे. समस्त महिला वर्ग पार नटून थटून हा सिनेमा बघायला जात असल्याचे दिसून येत आहेत. संपूर्ण थिएटरच महिलांनी भरल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात या सिनेमाने बक्कळ कमाई करत आपला दबदबा दाखवला आहे.

या सगळ्यातच सोन्याहून पिवळं म्हणजे ‘बाईपण भारी देवा’ या मराठी सिनेमाने आता तब्बल ५० कोटींची मोठी कमाई करत आहेत. तसेच इतर सिनेमाना धोबीपछाड केल्याचे दिसतंय आहे. सध्या सगळीकडेच या सिनेमाचं जोरदार कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे अवघ्या ५ ते ६ कोटींमध्ये बनलेल्या या सिनेमाने अवघ्या ३ आठवड्यात ५० कोटींचा मोठा विक्रम करून दाखवला आहे. अर्थातच मेकिंग बजेट वसूल करत या सिनेमाने १० पट नफा देखील कमावल्याचे दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने ६.१० कोटींची कमाई करत जबरदस्त ओपनिंग केली होती.

‘गदर’ला अख्ख्या बॉलिवूडचा विरोध, सनी देओलचा मोठा खुलासा…

त्यानंतर या सिनेमाच्या कमाईचा आकडा कायम चढता दिसून आला आहे. पहिल्या आठड्यामध्ये १३.५० कोटी, दुसऱ्या आठवड्यात तब्बल ३६ कोटी आणि तिसऱ्या आठवड्यात आता ५० कोटीपेक्षा अधिकची कमाई करत या सिनेमाने आपला जलवा दाखवला आहे. खर तर अजून देखील या सिनेमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. तर कायम थिएटर हाऊसफुल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सुचित्रा बांदेकर, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने आणि दीपा परब यांनी या सिनेमात मुख्य भूमिका साकारले आहेत. तसेच ६ बहिणींच्या आयुष्याभोवती फिरणारी ‘बाईपण भारी देवा’ची कथा सगळ्या चाहत्यांच्या मनावर चांगलीच रुचलेली आहे. प्रत्येक घरातलं बाईपण या सिनेमाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर बघायला मिळत आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube