‘गदर’ला अख्ख्या बॉलिवूडचा विरोध, सनी देओलचा मोठा खुलासा…

‘गदर’ला अख्ख्या बॉलिवूडचा विरोध, सनी देओलचा मोठा खुलासा…

मागील काही दिवसांपासून ‘गदर2’ चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरु आहे. गदर चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता ‘गदर2’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या सनी देओल या चित्रपटाचं प्रमोशन करीत आहे. नुकताच ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये सनी देओलने गदर2 चित्रपटाचं प्रमोशन केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

प्रमोशनदरम्यान, सनी देओलने मोठा खुलासा केला आहे. “गदरचा पहिला भाग प्रदर्शित होण्याची वेळ आली आणि बॉलीवूडमधील काही जणांनी या चित्रपटाचा विरोध करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर मी सांगितलं की हा पंजाबी चित्रपट आहे. त्यानंतर प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला आणि पसंती दिल्याचं सनी देओलने सांगितलं आहे.

बॉलिवूडमध्ये रांडगा अभिनेता म्हणून सनी देओलची ओळख आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर सनीने चाहत्यांच्या मनात घर तयार केलंय. अनेक चित्रपटांत धडाकेबाज अभिनय केल्यानंतर आता पुन्हा एकदा सनीचा ‘गदर2’ चित्रपट येणार आहे. हा चित्रपट कसा असणार? याचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे.

गदर चित्रपटाच्या पहिला भागात सनीने तारा सिंहची भूमिका साकारली होती. चित्रपटात सनी ट्रक ड्राईव्हर होता. तर दुसरीकडे अभिनेत्री अमिषा पटेलने सकीनाची भूमिका साकारली. भारत-पाकिस्तानच्या फाळणीवेळी घडलेल्या गोष्टींचा चित्रपटाच्या माध्यमातून उजाळा देण्यात आला होता.

त्यानंतर आता पुन्हा एकदा याच भूमिकेत दोन्ही अभिनेत्री आणि अभिनेता पडद्यावर झळकणार असल्याने चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. येत्या 11 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube