Download App

Radhakrishn Vikhe Patil : तांत्रिक कारणासाठी पंचनामे थांबवू नका, पीकांचे सरसकट पंचनामे करा…विखेंच्या सूचना

Radhakrishn Vikhe Patil : अहमदनगर जिल्ह्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाने> नुकसान झाले आहे. त्या सर्व पीकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishn Vikhe Patil ) यांनी यांनी प्रशासनास दिले आहेत. तसेच तांत्रिक कारणासाठी पंचनामे थांबवू नका, चारा उत्पादनासाठी नियोजन करा. अशा सूचना विखे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मदत करण्यात शासन कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी पहाणी दौऱ्याच्या निमिताने दिली.

विखेंनी पारनेर तालूक्यतील नुकसानग्रस्त गावांना भेटी देत शेतकऱ्यांच्या बांधावर देखील जात नुकसानीची पाहणी केली. गांजीभोयरे येथील एकनाथ खोदडे यांच्या नूकसान झालेल्या कांदा पीकाची पाहाणी केली. गारपीटीने नूकसान झालेल्या महादू बापुराव आढाव यांच्या ड्रॅगन फ्रूटच्या बागेची पाहाणी करुन माहिती घेतली. मंत्री विखे यांनी नूकसानीची माहिती घेवून मदतीबाबत त्यांना आश्वासित केले. तसेच शेतकरी महिला यांनी सांगितलेल्या समस्या जाणून घेतल्या. प्रामुख्याने जनावारांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला असल्याचे महिलांनी निदर्शनास आणून त्यांनी जिल्हाधिकारी तसेच अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना या समस्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

Hasan Mushrif : ‘पृथ्वीराज चव्हाणांमुळेच आघाडीची सत्ता गेली’; मुश्रीफांचं रोखठोक प्रत्युत्तर

अवकाळी पाऊस तसेच गारपीटीने सर्वाधिक नूकसान झालेल्या भागाची पहाणी करीत असलो तरी इतरही तालुक्यात नूकसान झालेल्या पीकांचे शंभर टक्के पंचनामे करण्यास सुरूवात झाली आहे. तांत्रिक कारणाने पंचनामे थांबणार नाहीत.या पंचनाम्याच्या अहवालानंतरच मदतीबाबत शासन निर्णय करेल असे सांगून पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की,यापुर्वी सुध्दा सरकारने अशा नैसर्गिक संकटात सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना भरीव मदतीची केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्षात निर्णयाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याची भूमिका बजावली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Hemangi Kavi : ‘झिम्मा 2’च्या अभिनेत्रींसाठी हेमांगी कवीची खास पोस्ट; म्हणाली, “आता हा खेळ…”

या संकटात सुध्दा एनडीआरएफच्या निकषाप्रमाणेच शासन मदत करण्याबाबत सकारात्मक असून दोन हेक्टरची अट शिथिल करून तीन हेक्टरपर्यत मदत करण्याबाबत शासनाचा निर्णय झाला आहे. राज्यातील नूकसानीची संपूर्ण माहिती समोर आल्यानंतर मदतीबाबत निर्णय होईल, असेही पालकमंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

झालेले नूकसान भरून येवू शकत नाही,पण या आपतीमध्ये चाऱ्याच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेवून पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्यावतीने चारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये अधिकची वाढ करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री विखे यांनी सांगितले. चारा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने यापुर्वी घेतला असून जिल्ह्यात चारा उत्पादनासाठी पशुसंवर्धन विभागाने नियोजन करून आराखडा तयार करावा. तसेच मूरघास उत्पादन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

Tags

follow us