Weather Update : पुढील 24 तास महत्वाचे; ‘या’ जिल्ह्यांत होणार अवकाळी पाऊस

Weather Update : पुढील 24 तास महत्वाचे; ‘या’ जिल्ह्यांत होणार अवकाळी पाऊस

Weather Update : राज्यात ऐन थंडीच्या दिवसांत अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस (Rain Alert) बरसत आहे. गारपीट होत आहे. या पावसामुळे फळबागा आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाचे संकट अजूनही मिटलेले नाही. आजही पावसाचा इशारा (Weather Update) देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्याच्या काही भागांत पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. नगर शहरात काल रात्री पावसाने हजेरी लावली. काही काळ वीजपुरवठाही खंडित झाला होता. अनेक ठिकाणी आज ढगाळ हवामान राहिल. या अवेळी होत असलेल्या पावसाने शेतातील पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. आताही पुढील 24 तासांत जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Rain Alert : आजही मुसळ ‘धार’!  ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. तसेच अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातही दोन दिवस पाऊस कायम राहिल अशी शक्यता आहे. या पावसाने राज्यात अनेक जिल्ह्यांत मोठे नुकसान केले आहे. सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हजारो हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील कळवण, नांदगाव, नाशिक, निफाड, जक्केश्वर, सटाणा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सिकर, चांदवड आणि येवला तालुक्यातील 33 हजार 388 हेक्टरवरील कांदा, द्राक्ष, सोयाबीन, मका, गहू, ऊस आणि फळपिकांना गारपिटीची फटका बसला आहे. धुळे जिल्ह्यातील सात्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील 234 हेक्टर क्षेत्रावरील केळी, पपई, कापूस, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे.

5 ऑक्टोरनंतर राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. ढगाळ वातावरण काही दिवस कायम होते. पण, पाऊस पडला नाही. ऑक्टोबर महिन्यात सर्वत्रच कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने कोकणातील काही भागांना ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानंतर आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरात तर पावसाला सुरुवातही झाली आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जर अन्य जिल्ह्यात पाऊस झाला तर या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

Weather Update : पुढील 24 तास महत्वाचे; ‘या’ जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा अलर्ट

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube