Hasan Mushrif : ‘पृथ्वीराज चव्हाणांमुळेच आघाडीची सत्ता गेली’; मुश्रीफांचं रोखठोक प्रत्युत्तर

Hasan Mushrif : ‘पृथ्वीराज चव्हाणांमुळेच आघाडीची सत्ता गेली’; मुश्रीफांचं रोखठोक प्रत्युत्तर

Hasan Mushrif : राष्ट्रवादी काँग्रेसनेच आमचं सरकार पाडलं असा आरोप केल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) सत्ताधारी अजित पवार गटाच्या निशाण्यावर आले आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्यानंतर आता वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनीही पृथ्वीराज चव्हाणांवर तोफ डागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्यासाठीच पृथ्वीराज चव्हाणांना राज्यात पाठवण्यात आलं होतं, अशी घणाघाती टीका मुश्रीफ यांनी केली.

कोल्हापूर विमानतळ येथे आज मंत्री मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्यासाठीच दिल्लीतून राज्यात पाठवण्यात आलं होतं. पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गेली, अशी घणाघाती टीका मुश्रीफ यांनी केली. आमदार बच्चू कडू यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) भविष्यात मु्ख्यमंत्री होतील असे वक्तव्य केले होते. यावरही मुश्रीफ यांनी भाष्य केले. बच्चू कडू मंत्री छगन भुजबळ हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचे म्हणत असतील तर 146 आमदार ज्यांचे निवडून येतील त्यालाच मुख्यमंत्रीपदावर बसता येईल, असा टोला लगावला.

Prithviraj Chavan : ..म्हणून राष्ट्रवादीनं आमचं सरकार पाडलं; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा खुलासा

काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण ?

मी कडक शिस्त लावण्यासाठी राज्य सहकारी बँक संचालक मंडळ बरखास्त केलं. हे मंडळ बरखास्त झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि माझ्यात वितुष्ट आले. हा निर्णय घेतला नसता तर भाजपाची महाराष्ट्रामध्ये सत्ता आलीच नसती. ती एक राजकीय चूक होती. सहकार क्षेत्राबद्दल मला फारसं माहिती नव्हतं. मी अनेक गोष्टी समजून घेतल्या. सहकार क्षेत्रामध्ये शिस्त आणायचा प्रयत्न केला. त्यावेळी राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाराज झाले. त्यांनतर आमच्यात वाद झाले. त्याचे परिणाम सरकार पडण्यात झाला. हे मंडळ बरखास्त केलं नसतं तर 2014 आणि 2019 ला देखील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच सत्ता राहिली असती. भाजप सत्तेत आली नसती अशी स्पष्ट कबुली चव्हाण यांनी दिली.

चव्हाणांमुळेच काँग्रेसचा चौथा नंबर – तटकरे

ज्या हेतूने पृ्थ्वीराज चव्हाण दिल्लीतून राज्यात आले. आघाडी सरकारची लय बिघडली. आघाडी सरकारमधील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून मी स्व. विलासराव देशमुख यांच्याकडे पाहतो. आघाडी सरकारचा मुख्यमंत्री कसा असावा याचं चांगलं उदाहरण ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दिलं. अशोक चव्हाणांनीही उत्तम काम केलं. पण, पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सतत पाण्यात बघतच त्यांचा कारभार करत आलेले होते. त्याचा परिणाम राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसलाच जास्त भोगावा लागला. आज राज्यात काँग्रेस चौथ्या क्रमांकावर गेली याला कारण कोण असेल तर ते पृथ्वीराज चव्हाण आहेत.

अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचंय ही जनतेची इच्छा; सुनील तटकरेंचं मोठं विधान

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube