अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचंय ही जनतेची इच्छा; सुनील तटकरेंचं मोठं विधान

  • Written By: Published:
अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचंय ही जनतेची इच्छा; सुनील तटकरेंचं मोठं विधान

Sunil Tatkare on ajit pawar : राज्यात एकीकडे विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल्याचं दिसतं. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अजित पवारांच्या मातोश्रींनी आपला मुलगा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा बोलून दाखलली. त्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनीही यावर भाष्य केलं.

बर्थडे बॉय किंग कोहलीचं शानदार शतक! सचिन तेंडुलकरच्या वनडे शतकांशी बरोबरी 

आज नागपूरात पत्रकार परिषदेत बोलतांना तटकरेंना की, मी वारंवार स्पष्ट केलं की, राष्ट्रवादीची, राज्यातील जनतेची आणि कार्यकर्त्यांची हीच इच्छा आहे की, अजित दादा मुख्यमंत्री व्हावेत. पूर्वी २००४ मध्ये त्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधीही आली होती. मात्र, तेव्हा त्यांची संधी हुकली… त्यांची का गेली, कोणामुळं गेली, यावर मी सध्या भाष्य करणार नाही. मात्र, अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री होण्याची आशा आणि आकांक्षा बाळगण्यात गैर काहीच नाही. मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असून त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील, अजितदादांचे वय लहान आहे, त्यांना पुढच्या काळात ही संधी मिळू शकते, असं मंत्री केसरकर म्हणाले. यावरही तटकरेंनी भाष्य केलं. ते म्हणाले, आम्ही वास्तवादी आहोत. आज आमच्यासमोर लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांचं आव्हानं आहे. केसरकर म्हणाले तसं फडणवीस-शिंदे-अजित पवारांच्या नेतृत्वात आगामी निवडणूका लढवू आणि महायुती म्हणून पुन्हा सत्तेत येऊ, असं तटकरे म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणूक पक्ष एनडीएसोबत लढणार असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट सर्व जागा जिंकेल, असंही तटकरे यांनी सांगितले.

जागावाटपावरून महायुतीत कलह असल्याचं बोलल्या जातं आहे, असं विचारताच तटकरे म्हणाले की, ज्यावेळी युती किंवा आघाडी असते, त्यावेळी पक्षाचे कार्यकर्ते जास्तीत जास्त जागा आपल्याला मिळाव्यात, यासाठी आग्रही असतात. कार्यकर्त्यांची मागणी स्वाभाविक आहे. अशी मागणी कुठल्याही पक्षात होऊ शकते. मात्र, जागावाटपाचा निर्णय सर्वसहमतीने घेतला जाईल,

राज्यात अनेकदा अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. शिवाय, काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनीही संधी मिळाल्यास अजित पवारांना पाच वर्षासाठी मुख्यमंत्री करू, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळं आगामी काळात अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केल्यानंतर अजित पवार आणि आठ आमदारांचा गट एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाला होता. त्यानंतर पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने त्यांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube