बर्थडे बॉय किंग कोहलीचे शानदार शतक! सचिन तेंडुलकरच्या वनडे शतकांशी बरोबरी

बर्थडे बॉय किंग कोहलीचे शानदार शतक! सचिन तेंडुलकरच्या वनडे शतकांशी बरोबरी

Virat Kohli : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) वनडेतील शतकांच्या विक्रमाची विराट कोहलीने (Virat Kohli) बरोबरी केली आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात विराट कोहलीने शतक ठोकत सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
हिटमॅन रोहित शर्मा ठरला सिक्सर किंग; एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमाची बरोबरी

आज विराटने आपल्या वनडे कारकिर्दीतील 49 वे शतक झळकवत सचिन तेंडुलकरच्या वनडेतील विक्रमाशी बरोबरी केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर त्याच्या कारकिर्दीत क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट फलंदाजी करायचा.

ऐन दिवाळीत लालपरीची चाके थांबणार? सरकारने मागण्यांबाबत चर्चा करावी अन्यथा उद्यापासून…; सदावर्तेंनी दिला इशारा

सचिनचे रेकॉर्ड मोडणे कोणाला शक्य होईल का? असा प्रश्न त्यावेळी क्रिकेटप्रेंमींना पडत असे. पण आज सचिन तेंडुलकरच्या एका विक्रमाची बरोबरी भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक मोठ-मोठे विक्रम आहेत. पण भारतीय संघाचा सध्याचा स्टार फलंदाज विराट कोहलीने त्याचा वनडेतील शतकाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. बर्थडे बॉय विराट कोहलीच्या शतकानंतर स्टेडियममध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. आज विराट कोहलीचा वाढदिवस आहे. त्याच दिवशी विराटने आपल्या चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने वादळी खेळी करत शानदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर मात्र एकापाठोपाठ टीम इंडियाला दोन धक्के बसले. पुढे किंग कोहलीनं मैदानावर पाय ठेवल्यानंतर मात्र टीम इंडियाचा डाव सावरला.

विराटने मैदानावर आपले वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. विराटने श्रेयस अय्यरच्या सहकार्याने धावांची शतकी खेळी केली. विराट कोहलीने 119 चेंडूमध्ये शतक केले आहे. विराट कोहलीच्या शतकी खेळीमध्ये 10 चौकारांचा समावेश आहे.

भारतीय संघाने 50 षटकांत 5 बाद 326 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेसमोर 327 धावांचे लक्ष्य ठेवले. विराटने 119 चेंडूमध्ये शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 49 वे शतक होते. सचिनने वनडेमध्ये 49 शतकं झळकावली आहेत.

सचिन तेंडुलकरने 452 वनडे सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती, तर विराटने 277 व्या एकदिवसीय डावात 49 शतकं झळकावली आहेत. विशेष म्हणजे आज वाढदिवसाच्या दिवशी त्याने शतक झळकावून विक्रमाची बरोबरी केली. या विश्वचषकातील त्याचे दुसरे शतक आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube