ऐन दिवाळीत लालपरीची चाके थांबणार? सरकारने मागण्यांबाबत चर्चा करावी अन्यथा उद्यापासून…; सदावर्तेंनी दिला इशारा

  • Written By: Published:
ऐन दिवाळीत लालपरीची चाके थांबणार? सरकारने मागण्यांबाबत चर्चा करावी अन्यथा उद्यापासून…;  सदावर्तेंनी दिला इशारा

ST employees Strike : ठाकरे सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी (ST employees) मोठ आंदोलन केलं होतं. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली होती. यासाठी सहा महिन्यांपासून आझाद मैदानावर एसटी कर्मचारी ठाण मांडून होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी एसटी कामगार संपावर जाणार आहेत. वकील गुणरत्न सदावर्त यांच्या नेतृत्वात एसटी कष्टकरी जनसंघ (ST Kasdhtakari Jana Sangh)उद्यापासून संप पुकारणार असल्याची माहिती आहे.

तब्बल 80 हजार कोटी पाण्यात! संपूर्ण धरणच नव्याने बांधण्याची केंद्रीय समितीची राज्याला सूचना 

विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण राज्यात बेमुदत संप केला होता. अनेक मागण्या मान्य केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता. मात्र, आता पुन्हा एसटी कर्चचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसणार आहे. सदावर्ते यांच्या नेतृत्वात एसटी कष्टकरी जनसंघ उद्यापासून संप पुकारणार आहे. सातवा वेतन आयोग आणि इतर मागण्यांसाठी हा संप असणार आहे. सरकारने मागण्यांबाबत चर्चा करावी अन्यथा 6 नोव्हेंबरपासून आम्ही संपावर जाऊ, असा इशारा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिला. सदावर्ते यांनी उद्यापासून सुरू होणाऱ्या या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

मविआचे सरकार असतानाही एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप केला होता. आता ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सदावर्तेंनी संपाचा इशारा दिल्यानंतर  ठाकरे गटनेत्या सुषमा अंधारे यांनीृ गुणरत्न सदावर्ते यांना टोला लगावला.

सुषमा अंधारे म्हणाल्या, गुणरत्न सदावर्तेंना आता जनता स्वीकारेल का? दिवाळीच्या तोंडावर एसटी आंदोलन सुरू करायचं म्हणजे, हे एक राजकारण आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचा माणूस असल्याचे बोललं जात आहे. एसटीचा बंद म्हणजे, मी फ़डणवीस यांचा माणूस नाही, हे सांगण्याचा भाबडा प्रयत्न आहे, असा टोला अंधारेंनी लगावला.

गुणरत्न सदावर्ते हे आता फडणवीस सरकारमध्ये असतांनाही आंदोलन करत आहेत. त्यांना आता लोक स्विकारतील का, हे पाहणं महत्वाचं आहे, असं अंधारे म्हणाल्या.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून आता सरकारकडूनही प्रतिक्रिया आली. मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर ताबडतोब संवाद साधला जाणार आहे. दिवाळीच्या तोंडावर संपावर जाऊ नये म्हणून प्रयत्न करणार, असंही मुनगंटीवार म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube