Shivajirao Kardile News : वांबोरी चारी टप्पा दोनच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचं प्रतिपादन शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांनी केलंय. राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी आज तिसगाव परिसरातील गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधलायं. यावेळी ते बोलत होते.
तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेवरील ‘आनंदडोह’ चित्रपटाची घोषणा, ‘या’ दिवशी होणार रिलीज
कर्डिले पुढे बोलताना म्हणाले, पाथर्डी हा जिराईत तालुका असून पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध संकटाला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न व दूध धंदा, शेती सिंचनाखाली आणण्यासाठी वांबोरी चारी टप्पा एक व दोन मार्गी लागावा त्यासाठी प्रयत्न केले. आता लवकरच टप्पा दोनचे काम सुरू होणार असून पाथर्डी तालुक्यातील तलाव भरण्याचे काम होणार आहे. वांबोरी टप्पा दोन पाथर्डी तालुक्यातील गावांसाठी वरदान ठरणार असून विकासाची कामे कोणी केली हे जनता ठरवणार असल्याचं कर्डिलेंनी स्पष्ट केलंय.
तसेच या विधानसभा निवडणुकीमध्ये मी राहुरी तालुक्यातूनच मताचे लीड घेऊन येणार आहे, तरी पाथर्डी तालुक्यातील जनतेने विकास कामांना मतदान करावे, ज्येष्ठ नेते काशिनाथ लवांडे यांचे गावाबद्दल असलेली अस्मिता आणि गावच्या विकासासाठी केलेले काम कौतुकास्पद आहे. तिसगाव परिसरातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा दिला आहे, मी नेहमीच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम केले असल्याचंही कर्डिलेंनी सांगितलंय.
पाण्याच्या योग्य नियोजनामुळे आंबेगावातील शेतकऱ्यांचे आयुष्य सुजलाम सुफलाम झाले : वळसे पाटील
दरम्यान, यावेळी काशिनाथ लवांडे, संभाजी पालवे, अमोल आगासी, धोंडीभाऊ हजारे, महादेव नजन, शिवाजी सागर, अशोक घाडगे, प्रशांत अकोलकर, रमेश शिंदे, राजेंद्र अकोलकर, शहाजी पाठक, बंडू पाठक, अनिल गीते, विनायक पाठक, रावसाहेब वांडेकर, अरुण रायकर, कुशल भापसे, कानिफनाथ पाठक, सतीश पालवे, अक्षय पालवे, अमोल सातपुते, सुनील उमाप, माधव लोखंडे, अंबादास शिंदे, शरद खंडागळे, भाऊसाहेब शेलार, सुरेश शिरसाट, काकासाहेब शिंदे, भरत गारुडकर, अदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निम्म्या रात्रीला देव नाही पण कर्डिले आठवतात…
खंडोबा वाडीचा पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होता महिलांना पायपीट करीत डोक्यावर हड्याने पाणी आणावे लागत होते, मात्र, शिवाजीराव कर्डिले पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यांनी पाण्याचा प्रश्न मार्गी लावला ही निवडणूक कर्डिले यांची नसून जनतेची आहे, विरोधक 5 वर्षे कुठे असतात, निवडणूक आली की भूछत्र्यासारखे येतात, निम्म्या रात्री अडचणीच्या काळात आम्हाला देव आठवत नाही परंतु कर्डिले आठवतात. आम्ही केव्हाही त्यांना फोन लावतो आणि प्रश्न मार्गी लावून घेतो अशी भावना बंडू पाठक यांनी व्यक्त केली.