पाण्याच्या योग्य नियोजनामुळे आंबेगावातील शेतकऱ्यांचे आयुष्य सुजलाम सुफलाम झाले : वळसे पाटील
Dilip Walse Patil Kopra Sabha : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची शिंदेवाडीमध्ये कोपरा सभा पार पडली. यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आंबेगाव तालुक्यामध्ये आपण पाण्याचं योग्य नियोजन केल्यामुळे बहुतांशी भाग बागायती झालाय. त्यामुळे रोजगार उपलब्ध होऊन रोजगारासाठी मुंबई (Assembly Election) आणि पुण्याला जाणारे लोंढे थांबले असल्याचं प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलंय.
शिंदेवाडी येथे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने कोपरा सभा झाली. याप्रसंगी पक्षाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, माजी सभापती कैलासबुवा काळे, राजाभाऊ काळे, (Assembly Election 2024) संतोष सैद, बंटी काळे, कपिल काळे, माऊली काळे, संजय शिंदे, सरपंच सारिका संजय शिंदे, मंदा बिडकर, किसन काळे, रोहन पोखरकर, स्वप्निल शिंदे, शंकर काळे, शंकर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील म्हणाले की, शिंदेवाडीसारख्या छोट्या वाडीचं रूप आता बदलत चाललंय.
मतदारसंघामध्येच रोजगार उपलब्ध झाल्याने मुंबई-पुण्याला जाणारे लोंढे थांबले ; दिलीप वळसे पाटील
वळसे पाटील म्हणाले की, आपण केलेल्या पाण्याच्या योग्य नियोजनामुळे शेतकरी शेती व्यवसाय चांगल्या पद्धतीने करत आहेत. शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळून राहणीमान देखील उंचावलंय. तालुक्यामध्ये आपण भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उभारला. त्यामुळे उसाचं क्षेत्र वाढलंय. कारखान्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मिळत आहेत. कारखान्यामुळे तालुक्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झालाय. शरद सहकारी बँक, खरेदी विक्री संघ, मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती या आर्थिक संस्थांमध्ये रोजगार उपलब्ध झाला असल्याचं वळसे पाटील म्हणाले आहेत.
धाराशिवच्या जिव्हाळ्याचा कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प लवकरच पूर्ण होणार -राणाजगजितसिंह पाटील
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, यापुढील काळामध्ये देखील आपल्याला अजून विकास कामे करायची आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या आहेत. मला काम करण्याची आपण पुन्हा संधी द्या, असं आवाहन वळसे पाटलांनी मतदारांना केलंय. येत्या 20 तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून बहुमताने निवडून द्या. असं आवाहन देखील वळसे पाटील यांनी केलंय. यावेळी माऊली काळे, किरण घोडेकर, सरपंच सारिका शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं.