Assembly Election : महिलांना महिन्याला 3 हजार अन् मोफत बस; काँग्रेसकडून पाच मोठ्या घोषणा

Assembly Election : महिलांना महिन्याला 3 हजार अन् मोफत बस; काँग्रेसकडून पाच मोठ्या घोषणा

Assembly Election : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु असून सत्ताधाऱ्यांनंतर आता विरोधकांकडून जनतेला गॅरंटी दिली जात आहे. भाजपनंतर आता काँग्रेसनेही (Congress) पाच गोष्टींची गॅरंटी देण्यात आलीयं. राज्यातील महिलांना महालक्ष्मी योजनेंतर्गत दरमहा 3 हजार रुपये तर महिला आणि मुलींना मोफत बस प्रवास देण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलीयं. महाराष्ट्र काबिज करण्यासाठी राहुल गांधी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून मुंबईतील आयोजित सभेत ते बोलत होते.

शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा का?; सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त वक्तव्य

पाच गोष्टींची काँग्रेसकडून घोषणा :
महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3 हजार रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.
शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन.
जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील.
25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे.
बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4 हजार रुपयांपर्यंत मदत.

राहुल गांधी बोलताना म्हणाले, अदानी धारावीची जमीन हिसकवू शकतो पण रोजगार देऊ नाही शकत. देशात राज्यात रोजगार लघद्योग करणारे देऊ शकतात, पण नोटबंदी आणि जीएसटीसारख्या पॉलिसिजमुळे भाजपने लघुद्योगांना संपवून टाकलंय, अशी टीकाही राहुल गांधी यांनी एनडीए सरकारवर केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube