मी दहशत, दादागिरी करतो असं जनता म्हणत नाही, हे काम फक्त नेतेमंडळी करतात; शिवाजीराव कर्डिले
Mahayuti Candidate Shivajirao Kardile In Letsupp Charcha : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरीतील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांच्यासोबत लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी संवाद साधला. यावेळी लेट्सअप चर्चा या कार्यक्रमात ते बोलत होते. राहुरीत भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले हे सहाव्यांदा मैदानात आहेत. आतापर्यंत पाच निवडणूका झाल्यात. त्यापेक्षाही मला ही सहावी निवडणूक (Assembly Election 2024) सोपी वाटते, असं शिवाजीराव कर्डिले म्हणाले आहेत. कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळालया लागली, त्यामुळे विश्वास वाढला असल्याचं शिवाजीराव कर्डिले म्हणाले आहेत. गेली पाच वर्ष सत्तेबाहेर असूनही मला केव्हा आमदार नाही, असं जाणवलं नाही. जनता माझ्याप्रेम करते, 1995 पासून जो काही जनता दरबार भरवतो, त्याला तितकाच प्रतिसाद आजही मिळतो. तेवढीच गर्दी असते, असं शिवाजीराव कर्डिले (Mahayuti) म्हणाले आहेत.
“साखरसम्राटांची पोळी आता भाजणार नाही, आम्ही कुणालाही..”, हर्षदाताई संतापल्याच
सकाळी जनता दरबारात लोकांच्या कामांची विचारणा करतो. त्यानंतर तलाठी, ग्रामसेवकांपासून अगदी कलेक्टरपर्यंत फोन लावून त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम करतो, असं शिवाजीराव कर्डिले म्हणाले आहेत. सुरूवातीला आमच्याकडे 25 म्हशी होत्या. तेव्हा त्यांचं दूध काढून शहरात रतीब वाटायचं काम करायचो. त्यावेळी लोकांसोबत जवळीक झाली होती. त्यांचीच मोठी साथ लाभली, असं कर्डिले म्हणाले. 1984 साली बुऱ्हाणनगरचे ग्रामस्थ एकत्र आले अन् ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली होती. मी नगरमध्ये असतानाच मला बिनविरोध सरपंच करण्याचं काम गावकऱ्यांनी केलं होतं, असं देखील कर्डिले म्हणाले.
महायुती की महाविकास आघाडी?, कोण येणार सत्तेत? ‘IANS’ च्या सर्वेक्षणाने थेट आकडेवारीच मांडली
राजकारण आणि समाजाच्या कामाची मला पहिल्यापासून आवड होती, असं कर्डिले म्हणाले. दूधवाला आणि कमी शिक्षण यामुळे काही फरक पडत नाही. प्रत्यक्ष जनतेत जावून काही गोष्टी शिकायला मिळतात. 1995 साली अपक्ष आमदार झालो, त्यावेळी मुंडे साहेबांनी माझ्याशी संपर्क केला. त्यावेळी त्यांनी एकच मागणी केली की, कर्डिले साहेब मला राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यासाठी मला तुमचा पाठिंबा हवाय, त्यावेळी मी बिनशर्त पाठिंबा देण्याचं काम केलं. त्यावेळी मी फक्त नगर -नेवासा तालुक्याच्या पाण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती. त्यानंतर तो प्रश्नही सुटला.
वांबोरी चारीच्या पाणी प्रश्नावर बोलताना कर्डिले म्हणाले की, वांबोरीचं पाणी मी 2009 मध्ये आमदार झाल्यानंतर पाथर्डी तालुक्यातील चाळीसगावला देण्याचं काम केलंय. मी प्रत्येक वेळेला लक्ष घालण्याचं काम करतो, पण कधी प्रसिद्धी करण्याचं काम करत नाही, असं देखील कर्डिले म्हणालेत. मला फेसबूक, इन्स्टाग्राम पाहण्याची गरज वाटत नाही, कारण मी रोज जनतेत आहे. जो जनतेत जात नाही, तो फेसबूक सोशल मीडियावर राजकारण करतो, अशी टीका देखील त्यांनी केलीय. 1995 पासून 2004 पर्यंत काळ वेगळा होता. त्यानंतर काळ बदलला आहे, त्यानुसार जावं लागतं. माझा स्वभाव आणि बोलण्याची पद्धत आहे. मी स्पष्ट बोलणारा लोकप्रतिनिधी आहे. परंतु याला कोणी वाईट पद्धतीने घेत असेल तर ते चुकीचं आहे. दहशतीचं राजकारण केलं असतं तर माझ्यासारखा एक साधारण माणूस विधानसभेचा माणूस झाला नसता. माझ्या मागे कोणताही राजकीय वारसा नव्हता. मी दहशत करतो, दादागिरी करतो असं जनता कधी म्हणत नाही, हे काम फक्त नेतेमंडळी करते, असंही शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितलं आहे.