Shivajirao Kardile : तनपुरेंच्या बालेकिल्लातून शेकडो तरुणांचा कर्डिले गटात प्रवेश

  • Written By: Published:
Shivajirao Kardile : तनपुरेंच्या बालेकिल्लातून शेकडो तरुणांचा कर्डिले गटात प्रवेश

Shivajirao Kardile : विधानसभा निवडणुकीसाठ (Vidhansabha Election) आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. आज राहुरी मतदारसंघातील (Rahuri Vidhansabha) शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप (BJP) उमेदवार शिवाजीराव कर्डिलेंव (Shivajirao Kardile) विश्वास दाखवून भाजपमध्ये प्रवेश केला.

जरांगेंनी तुतारीला पाठिंबा द्यावा, उगाच ताकाला जाऊन भांड का लपवता?, हाकेंचा खोचक टोला… 

राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून नगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बुऱ्हाणनगर येथील कर्डिले यांच्या निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. राहुरी मतदारसंघातून अनेक कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते.

कर्डिलेंना उमेदवारी जाहीर होताच राहुरी तालुक्यातील कुलदीप पवार अणि नरेंद्र शेटे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह कर्डिलेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यात सुरेश बानकर, नंदू डोळस, भैय्या शेळके, ज्ञानेश्वर भिंगारदे, रवी म्हसे, सचिन शेटे, उमेश शेळके, अभिजित लिप्टे, भिमराज आव्हाड, रंभाजी गावंडे, बाबासाहेब शिंदे, मच्छिंद्र हरीश्चंद्रे, भाऊसाहेब जाधव, गौतम माळी, अमोल उल्हापुरे, भैय्या बोरूनडे, लक्ष्मण खाचकर रवी बलमे, कृष्णा मोटे, कुलदिप शिरसाठ, सौरभ शिरसाठ, कृष्णा मोटे, लाला शेडगे, पवा गिरासे, श्रीनाथ शेटे, मनोज बाचकर,अविनाथ तोडमल, गणेश रंगले, हेमंत मकासरे, रवेन बाचकर, अविनाश चोपडे, जयपाल गिरासे, युवराज बर्डे, जुनेदभाई इनामदार, दिपक पेंढारेंचा समावेश आहे.

पुणे शहरातील तीन विद्यमानांना पुन्हा संधी तर तीन जागांवर सस्पेन्स कायम… 

आमदार प्राजक्त तनपुरे यांचा बालेकिल्ला असलेल्या राहुरीतूनच ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेकडो कार्यकर्त्यांनी कर्डिलेंना साथ देण्याचा निर्णय घेतल्यानं विरोधकांच्या गोटात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, भाजपकडून आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत भाजपने 99 जागांसाठी उमेदवार जाहीर केले. यात शिवाजीराव कर्डिलेंनाही संधी देण्यात आली. 2019 मध्ये कर्डिलेंचा यांचा राहुरी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. यंदाही भाजपने कर्डिलेंना संधी दिली, तर शरद पवार गटाकडून प्राजक्ता तनपुरे निवडणुकीच्या आखाड्यात असणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळं राहुरीत पुन्हा कर्डिले आणि तनपुरे यांच्यातच सामना होणार असल्याचं निश्चित झालं असून 2019 च्या पराभवाचा वचपा कर्डिले कसा काढणार? हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube