जरांगेंनी तुतारीला पाठिंबा द्यावा, उगाच ताकाला जाऊन भांड का लपवता?, हाकेंचा खोचक टोला…
Laxman Hake : विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) उमेदवार द्यायचे की पाडायचे याबाबतच आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मोठा निर्णय घेतला. जिथे आपला उमेदवार निवडून येण्याची शक्यता असेल, तिथे उमेदवार देणार तर इतरत्र आमच्या मागण्या पूर्ण केल्या तरच पाठिंबा देणार असं उमेदवारांकडून बॉन्ड पेपरवर लिहून घेणार, अशी भूमिका जरागेंनी घेतली. यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake) जरांगेंवर हल्लाबोल केला.
पुणे शहरातील तीन विद्यमानांना पुन्हा संधी तर तीन जागांवर सस्पेन्स कायम…
गेल्या सहा सात महिन्यात जरागेंनी दूषित वातावरण तयार केलं. जरांगेंनी सरळ तुतारीला पाठिंबा द्यावा. ताकाला जाऊन भांड का लपपवता ?, असा टोला हाकेंनी लगावला.
आज लक्ष्मण हाकेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना जरागेंनी घेतलेल्या भूमिकेविषयी विचारलं असता ते म्हणाले, गेल्या सहा सात महिन्यात जरांगे पाटील यांनी दूषित वातावरण निर्माण केलं. त्यांना उमेदवार मिळू नये? जरांगे यांनी 50 उमेदवार ततरी उभे करून दाखवावे असं आव्हान हाकेंनी दिलं. हाके म्हणाले, आमच्या मागण्य़ा पूर्ण केल्या तरच पाठिंबा देणार आणि उमेदवारांकडून बॉन्ड पेपरवर लिहून घेणार असं ते म्हणतात. पण, तुमच्या स्टॅम्पला कोण ऐकणार? संविधानाची शपथ घेऊन मुख्यमंत्री बेकायदा वागतात. तुझा बॉण्ड पेपर कुठे टिकणार आहे?, असा सवाल हाकेंनी केला.
ज्योती मेटेंचा शरद पवार गटात प्रवेश, राष्ट्रवादीकडून बीड विधानसभा लढणार?
ताकाला जाऊन भांड का लपवता?
लोकसभा निवडणुकीवेळी जरांगेंनी तुतारीच्या बैठका घेतलल्या. आताही जरांगेंनी उघड उघड भूमिका घ्यावी. बेकायदा मागणी करायची आणि लोकांना कोणाच्यातरी दावणीला नेऊन बांधायचं. त्यापेक्षी जरांगे यांनी सरळ तुतारीला पाठिंबा द्यावा. हिम्मत असेल तर तुतारीचा प्रचार करावा. ताकाला जाऊन भांड का लपपवता ? असा खोचक टोला हाकेंनी लगावला.
पुढं हाके म्हणाले की, जरांगे तुम्ही सुपाऱ्या घ्यायचं बंद करा, दोन दिवसात तुम्हाला कोण कोण भेटलं हे आम्हाला ठाऊक आहे. सरळ राजकारणात जा. उगाच जनतेला वेड्यात काढू नका. तुम्ही एससी, एसटीसाठी राखीव मतदारसंघात उमेदवार देणार नाही असं म्हणतात. अहो लोकशाही अशी नसते जरांगे. निवडणुकीला सामोरे जातांना सर्वसमावेशक भूमिका भूमिका घ्यावी लागते. कुठल्यातरी पक्षाच्या नेत्याला शिव्या देऊन, हाकेंना बदनाम करून, भुजबळांना कमरेखालची भाषा वापरून निवडणूक जिंकता येत नसतात, असं हाके म्हणाले.
शरद पवार एनिमी नंबर वन…
शरद पवारांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला. त्यांनी जरांगेंचा पाठिंबा घेतला. जरांगेनी मदत केली. त्यामुळं शरद पवार एनिमी नंबर वन आहेत, असंही हाके म्हणाले.
दरम्यान, ओबीसी समाजाची माणसं कायद्याच्या सांभागृहात जाणे महत्वाचं आहे. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी समाज निश्चित योग्य भूमिका घेईल, असंही हाकेंनी स्पष्ट केलं