Video : कौटुंबिक कलहातून पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केला?, स्वत: संजय काकडेंनी दिली A टू Z माहिती

पुणे आणि पुण्यातलं राजकारण, देवाभाऊ की साहेब? पत्नीच्याबद्दल आलेल्या बातम्या असा अनेक विषयांवर संजय काकडे यांची दिलखुलास मुलाखत.

  • Written By: Published:
KAKADE PUNE

ज्याला जे बोलू वाटत ते बोलतं. अनेक लोक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देवाभाऊ म्हणातात. परंतु, मला तसं काही बोलू वाटत नाही. त्यांना साहेब म्हणणचं योग्य वाटत. सारखा देव देव जप करण्याने काही होत नसत. (Pune) तसंच, मी जर देवाभाऊ म्हटलो आणि फडणवीस पंतप्रधान होणार असतील तर त्यांना मी देवाभाऊ म्हणायला सुरूवात करतो अशा शब्दांत देवाभाऊ शब्दावर माजी खासदार संजय काकडे यांनी भाष्य केलं आहे. ते लेट्सअप मराठीवर बोलत होते. त्यांना अनेक विषयांवर संपादक योगेश कुटे यांनी बोलतं केलं आहे.

मला बाजूला करेल असा कुणी माईका लाल नाही

पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकांत तुमच्यावर भाजपने काही जबाबदारी दिली. परंतु, स्थानिक लोकांनी तुम्हाला बाजूला केलं तर काय? या प्रश्नावर बोलताना काकडे म्हणाले, जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला जबाबदारी दिली तर कुणी माईका लाल नाही जो मला बाजूला करेल.तसंच, मला बाजूला करण्याची कुणाची पात्रताही नाही असंही ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याने आपलं भाजपमध्ये काय वजन आहे हे ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच, आपल्याला कुणीच बाजूला करु शकत नाही. कारण सर्वांनाच आपण कायम मदत केली आहे.

Sanjay Kakade: माजी खासदार संजय काकडेंच्या पत्नी रुग्णालयात, अन्नातून विषबाधा झाल्याने प्रकृती खालावली

2012 ला मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी कोणत्या पक्षाचा सदस्य नव्होत. परंतु आता, मी भाजपचा उपाध्यक्ष आहे. तसंच, भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांना एक स्थान आहे. त्यामुळे मी काही मोकळा नाही. काही बंधन आहेत. त्यामुळे फडणवीस म्हणाले लढ तर लढायचं. म्हणाले, अपक्ष लढ तरी लढायचं आणि नको लढू म्हणाले तरी गप बसायचं असं म्हणत आपण आता पक्ष सांगेल ते करणार असे संकेत काकडे यांनी दिले आहेत.

कौटुंबीक विषयावरही केलं भाष्य

काही दिवसांपूर्वी कुटुंबात भांडण झाल्याने पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केला अशा बातम्या आल्या. परंतु, तुम्ही ते प्रकरण दाबलं असं विचारलं असता काकडे म्हणाले, यामध्ये एक लाख टक्के काहीच तथ्ये नाही. मी दुबाईत होतो. मुलगा गोव्यात होता आणि पत्नी एकटीच घरी होती. दरम्यान, तीला जेवणातून काहीतरी विषबाधा झाली होती. त्यानंतर ती रुग्णालयता गेली. उपचार घेऊन ती दोन दासातच घरी आली. स्वत: चालत घरी आली. त्यामुळे असं काहीच घडलं नाही. परंतु, अनेक माध्यम प्रतिनिधींनी काही खात्री न करता बातम्या दिल्या हे योग्य नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

follow us