जयंतराव, मी तुझ्या कितव्या बायकोचं मंगळसुत्र चोरलयं; दसरा मेळाव्यात पडळकरांची जीभ पुन्हा घसरली

BJP MLA Gopichand Padalkarजयंत पाटील यांच्या वरती थेट टीका केली. त्यावेळी मात्र त्यांची जीभ घसरल्याचा पाहायला मिळालं.

Untitle (9)

BJP MLA Gopichand Padalkar Criticize Jayant Patil for allegations of thief Mangalsutra : गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये आरक्षणासह राजकीय नेत्यांच्या एकमेकांवरील आक्षेपार्ह टिप्पण्यांवरून वादात सापडलेले आहेत. त्यामध्ये आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांच्यावरती वैयक्तिक टीका करताना पातळी सोडून टीका करताना दिसत आहेत. यावेळी देखील पडळकर यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचे टीका केली आहे.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले की, बडी सी बडी हस्ती मीट गई मुझे मिटाने में, तेरी उमर जायेगी मुझे मिटाने में. असं म्हणत पडळकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तर जयंत पाटलांवर बोलताना त्यांनी थेट म्हटलं की, मला मंगळसूत्र चोर म्हणतात जयंत पाटील यांनी सांगावं त्यांच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र. राष्ट्रवादीकडून वारंवार गोपीचंद पडळकर यांवर मंगळसूत्र चोराचा आरोप केला जातो. त्याला उत्तर देताना पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या वरती थेट टीका केली. त्यावेळी मात्र त्यांची जीभ घसरल्याचा पाहायला मिळालं.

‘सकाळ तर होऊ द्या’ चा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

follow us