मराठा समाजाला कुणबी दाखले द्या पण वेगळा प्रवर्ग करा; गोपीचंद पडळकारांची वादात उडी
MLA Gopichand Padalkar: ही गोष्ट खरी आहे. वार्डात एक दाखला कुणबीचा निघाला तरी राजकीय आरक्षण गेलेच समजा. त्यामुळे मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग.

MLA Gopichand Padalkar On Maratha Reservation: हिंदू-बहुजनांचा दसरा मेळावा आरेवाडीतील बिरोबा बन येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी ( MLA Gopichand Padalkar) विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय. तसेच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून गोपीचंद पडळकर यांनी आपली भूमिका जाहीर केलीय. कुणबी प्रमाणपत्रामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले आहे. मराठा समाजाला (Maratha Reservation) नोकरी व शिक्षणात आरक्षण द्या पण त्यासाठी वेगळा प्रवर्ग तयार करा आणि त्यात कोटा ठरवा.
खाडाखोड करून खोटे टाखले काढले
कुणबी प्रमाणपत्रावरून आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्याने ओबीसीचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. ही गोष्ट खरी आहे. वार्डात एक दाखला कुणबीचा निघाला तरी पंचायत समिती, झेडपी, महानगरपालिका, नगरपंचायतीमधील आरक्षण गेलेच समजा. अनेक बनावट दाखले काढले आहेत. खाडाखोड करून खोटे दाखले काढले आहेत. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मराठा समाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात मराठा समाज जास्त आहेत. त्यांच्या नोंदी मराठा-कुणबी, कुणबी मराठा त्यांचा वेगळा प्रवर्ग तयार करा. हा प्रवर्ग शिक्षण, नोकरीसाठी वेगळा ठेवा. त्यांची संख्या मोजा. दाखले किती दिले, मी जबाबदारीने बोलताने मी कुणाची खोड काढत नाही. पाँइट 25 टक्के आरक्षण द्या. नोकरी व शिक्षणाचे आरक्षण द्या. राजकीय आरक्षण देऊ नका ? त्यातून ओबीसी आणि मराठा आरक्षणा मिटणार आहे. (Maratha should give Kunbi records but make it a separate category; Gopichand Padalkar)
तर मी धनगरांसाठी सरकारविरोधात राहील
धनगर समाज एसटीचा दाखला मिळविण्यासाठी झगडत आहे. महाराष्ट्रातील धनगरचा पोरांच्या हातामध्ये एसटीचा दाखला पडला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. मागणी आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काल माझी हीच भूमिका होती. आज आणि उद्या तीच भूमिका राहिल. जेव्हा सरकार व धनगर असा संघर्ष सुरू होईल. तेव्हा मी धनगराच्या बाजूले राहिले. काही शंका आहे का तुम्हाला, असे पडळकर म्हणाले. जेव्हा सरकार आणि विरोधकांचा विषय आहे. तेव्हा मी सरकारच्या बाजूने छातीची ढाल करून उभा राहील. जेव्हा देवाभाऊच्या विरोधात जातीवादी पिलावळ पुढे असेल तेव्हा मी देवाभाऊसाठी बाजी प्रभू देशपांडेंची भूमिका घेईल. कारण बहुजनांना, ओबीसी, धनगरांना कुणी न्याय देऊ शकतो तो म्हणजे देवाभाऊ आहे. धनगरांचा पोरांच्या हातामध्ये एसटीचा दाखला द्यावा. ही एकमेव मागणी असल्याचे ते म्हणाले.