Ahmednagar News : नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग (Railway Line) प्रकल्पातंर्गत निंबळक ते वांबोरी या २२ कि .मी. अंतराची चाचणी नुकतीच पार पडली. लवकरच नगर ते मनमाडपर्यंतचे हे काम पुर्ण होणार असुन यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या पुर्ण मार्गात इलेक्ट्रीक इंजिनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून नगर ते मनमाड द्रुतगती (डबललाईन) रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे.
Horoscope Today: ‘वृषभ’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
यापूर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई ते अंकाई किल्ला, अंकाई किल्ला ते मनमाड ,कोपरगाव ते कान्हेगाव,बेलापूर ते पुणतांबा,बेलापूर ते पढेगाव या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. आता गुरुवारी 22 किमी डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली. आता ऐकूण 107 किलोमीटर अंतराची चाचणी पूर्ण घेतल्याची माहिती दीपक कुमार उप मुख्य अभियंता (बांधकाम) अहमदनगर यांनी दिली .
महायुतीत जागावाटपावरून तिढा! रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपचीच; राणे शड्डू ठोकत मैदानात
मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्वपुर्ण टप्पा येतो . मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होता. तसेच सिंगल लाईन मुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता. तासोनतास रेल्वे गाडी एकाच जाग्यावर थांबुन ठेवावी लागत . मात्र आता हा पुर्ण मार्ग इलेक्ट्रीक इंजीनचा वापर करून डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वेगाडयांचा थांबा आता बंद होणार आहे.
Sai Tamhankar : त्या खास गोष्टीच्या आठवणीने सई झाली भावूक, पोस्ट करत म्हणाली
या कामामुळे रेल्वे ताशी 130प्रति किमी वेगाने धावणार असल्याने रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे. तीन वर्षापासुन हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंड पर्यंत काम पुर्ण होणार आहे. गुरुवारी झालेल्या चाचणीत या द्रुतगती मार्गाचा नेमका वेग काढण्यात आला. नगर ते मनमाड पर्यतंचा टप्पा पुर्ण होण्यास अजुन एक वर्ष लागतील असा अंदाज आहे यावेळी ताशी 130 वेगाने रेल्वे धावली.