आंदोलन हलक्यात घेऊ नका, पाठिंबा द्यायला शरद पवार येणार…; राष्ट्रवादीचा विखेंना इशारा

मंत्री विखे यांनी तातडीने शेतकऱ्यांना आश्वासित करावे. अन्यथा शरद पवार हे देखील आंदोलनाच्या रिंगणात उतरतील, असा इशारा फाळके यांनी दिला.

RAJENDRA FALAKE

RAJENDRA FALAKE

अहमदनगर – दुधाल हमीभाव (Guaranteed milk price) मिळावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. मात्र दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली नाही किंवा कोणत्याही प्रकारचे आश्वासन दिले नाही. यावरून आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके (Rajendra Phalke) यांनी विखेंना इशारा दिला.

मुहूर्त ठरला! अजितदादांच्या नेत्याने घेतली शरद पवारांची भेट, आझम पानसरे पवारांना साथ देणार… 

मंत्री विखे यांनी तातडीने शेतकऱ्यांना आश्वासित करावे. अन्यथा येत्या काळात आंदोलन तीव्र स्वरूपात केले जाईल. शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी शरद पवार हे देखील आंदोलनाच्या रिंगणात उतरतील, असा इशारा फाळके यांनी दिला.

कांदा प्रश्न व दुधाला चाळीस रुपये हमीभाव मिळावा, या मागणीसाठी खासदार लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी सकाळपासून उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मात्र अद्याप या आंदोलनाची प्रशासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांसह लंके यांनी दिला.

सागरिका म्युझिकची यशस्वी 25 वर्ष पूर्ण’; ‘नानाछंद’ द्वारे सादर करणार नाना पाटेकरांमधील गीतकार 

याविषयी बोलताना जिल्हाध्यक्ष फाळके म्हणाले की, जिल्हाधिकारी आंदोलकांचे वेदन घेण्यासाठी आलेत नाही किंबहुना मंत्री विखे यांनी त्यांना येण्यास मज्जाव केला असेल. दुग्ध विकास मंत्री हे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. शेतकरी दूध प्रश्नांवरून आक्रोश करत आहे. त्यामुळं मंत्री विखे यांनी उपोषणस्थळी येऊन शासनाची याबाबत भूमिका काय आहे हे स्पष्ट करावे, असं म्हणत शासनाने जाहीर केलेले हमीभाव फसवे आहेत, अशी टीकाही फाळकेंनी केली.

राज्य सरकारने दुधाला जे 30 रुपये दर आणि पाच रुपये अनुदान जाहीर केलं. ते फसवं आहे. दुध उत्पादनासाठी येणारा प्रति लिटर खर्च 42 रुपये येतो, तरीही सरकारने 30 रुपये दर कोणत्या आधारावर दिला? असा सवाल फाळकेंनी केली.

दुधाला दर देण्याबाबत शासनाच्या हाती असताना देखील शासनाकडून कोणतेही पाऊल उचलले जात नाही. जिल्ह्यातील शेतकरी उपोषणाला बसले असल्याने पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे पालकमंत्री विखे यांनी उपोषण स्थळी येत दुधाला हमीभाव मिळवून देऊ, अधिवेशनात याबाबत आश्वासित केले पाहिजे, अशी मागणी यावेळी फाळके यांनी केली.

…तर दोन दिवसात शरद पवार नगरला येणार
दूध दरावरून छेडलेल्या आंदोलनाबाबत प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने आता आंदोलनाची तीव्रता वाढणार आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते देखील नगरला येणार आहेत. तसेच येथे दोन दिवसात कोणताही निर्णय झाला नाही तर शरद पवार हे देखील उपोषण स्थळी येतील, असं फाळकेंनी स्पष्ट केलं.

जिल्हाधिकाऱ्याच्या नावाने थापल्या भाकरी...
दरम्यान, या आंदोलनाची प्रशासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेव, वेळप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोपड्या टाकू, असं आंदोलकानी सांगिलतं. आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच चूल मांडत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने भाकरी भाजल्या.

Exit mobile version