दुधाला ३० रुपये दर आणि पाच रुपयांच्या अनुदानावर शासनाकडून शिक्कामोर्तब; मंत्री विखेंची माहिती

दुधाला ३० रुपये दर आणि पाच रुपयांच्या अनुदानावर शासनाकडून शिक्कामोर्तब; मंत्री विखेंची माहिती

Radhakrishna Vikhe Patil : राज्यातील दूध उत्पादक (Milk producer) शेतकऱ्यांना प्रतिलिटर 30 रुपये आणि प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटी (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितले. हे दर 1 जुलैपासून लागू होणार असून, दूध पावडरसाठी (Milk Powder) प्रतिकिलो 30 रुपये अनुदान देण्यावरही आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं.

‘तो’ कॅच अन् आम्ही काढलेली सरकारची ‘विकेट’ कोणी विसरणार नाही, शिंदेंची तुफान फटकेबाजी 

दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यभरातील सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघ आणि दूध उत्पादकांची तातडीची बैठक मंत्रालयात बोलावली होती. या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संघांच्या मागण्या समजून घेऊन राज्यातील सर्व खासगी व सहकारी दूध संघांने शेतकऱ्यांना प्रतिलिटर 30 रुपये दर देण्याचे सर्वानुमत निश्चित केल्याचे सभागृहाला सांगितले.

…तर रोहितनेच नाहीतर आम्हीही तुझ्याकडे बघितलं असतं; अजितदादांची सूर्यकुमारच्या कॅचवर टोलेबाजी 

त्यानंतर शासन शेतकऱ्यास पाच रुपये प्रतिलिटरचे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करेल. जेणेकरून शेतकऱ्याला प्रतिलिटर 35 रुपये मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते या निर्णयाला संमती दर्शवली. लवकरच याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला जाईल, असं मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त बाजारभाव मिऴण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी सरकार कटिबध्द असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज