…तर रोहितनेच नाहीतर आम्हीही तुझ्याकडे बघितलं असतं; अजितदादांची सूर्यकुमारच्या कॅचवर टोलेबाजी

…तर रोहितनेच नाहीतर आम्हीही तुझ्याकडे बघितलं असतं; अजितदादांची सूर्यकुमारच्या कॅचवर टोलेबाजी

Ajit Pawar : टी 20 विश्वचषक (T20 World Cup) जिंकलेल्या टीम इंडियाच्या (Team India) मुंबईतील चार खेळाडूंचा आज विधानभवनात सत्कार करण्यात आला. विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma,, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांचा सत्कार आणि गौरव करण्यात आला. यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या भाषणात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)  याच्यावर एक मिश्किल टिप्पणी केली.

फाईव्ह स्टार आश्रम, आलीशान गाड्या; हाथरसमधील भोले बाबांची संपत्ती तरी किती? 

… तर तुला बघितलंचं असतं
या कार्यक्रमात बोलतांना अजित पवार म्हणाले, सूर्यकुमार यादवने ज्या प्रकारे तो झेल घेतला तो घेतांना सीमारेषेपार त्याचा पाय जरी टेकला असता तरी आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळाला नसता. त्यामुळं सुर्यकुमार यादवचं खूप खूप अभिनंदन. सर्व भारतीयांचे लक्ष तुझ्याकडे लागून होतं. रोहितनं सांगितलंच की तो तू घेतला नसतास तर तुला बघितलंचं असतं. पण, केवळ रोहितनंच नव्हे तर आम्ही सर्वांनीच तुझ्याकडे बघितलं असतं, असं अजित पवार म्हणाले.

तेव्हा मोदींनी फोन केल्यानंतरच माझं मन हलकं झालं; पंतने सांगितला ‘तो’ किस्सा… 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यासाह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या अध्यक्षा नीलम गोऱ्हे यांच्यासह सर्व आमदार व मान्यवर उपस्थित होते.

आमचे लोक फार वेडे आहेत. जिंकल्यांनंतर इतका उदो उदो करतात आणि हरल्याननंतर दगड मारायला कमी करत नाहीत. आपल्याकडे खिलाडूपणा पाहायला मिळत नाही, असं अजित पवार म्हणाले.

83 मध्ये वानखेडे स्टेडियमवर अशीच गर्दी झाली होती. आत्ता सूर्यकुमार यादवने जी कामगिरी केली, तीच कामगिरी त्यावेळी कपिल देव यांनी केली होती, अशी आठवण यावेळी अजित पवार यांनी सांगितली.

सुर्यकुमारने केलं पोलिसांचं कौतुक
तर यावेळी बोलतांना सुर्यकुमार यादवने आपलं मनोगत व्यक्त केलं. यादव म्हणाला की, इथं बसलेल्या सर्वांना भेटून चांगल वाटलं. हा प्रसंगही मी कधीच विसरू शकत नाही. सर्वांचे खूप खूप आभार. माझ्याकडे सध्या बोलण्यासाठी शब्द नाही, असं म्हणत त्याने मुंबई पोलिसांचंही कौतुक केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube