जखमा झाल्या, श्वासही कोंडला; टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडनंतर १० जण रुग्णालयात

जखमा झाल्या, श्वासही कोंडला; टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडनंतर १० जण रुग्णालयात

Team India Victory Parade : विश्वविजेत्या टीम इंडियाचं काल मुंबईकरांनी (Team India) दणक्यात स्वागत केलं. मरीन ड्राइव्ह परिसरात (Marine Drive) काढण्यात आलेल्या विजयी रॅलीत हजारो क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती. हा परिसर माणसांच्या गर्दीने खचाखच भरून गेला होता. पाय ठेवायलाही जागा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. खेळाडू बसवर उभे राहून लोकांना प्रोत्साहन देत होते. खाली मात्र गर्दीत अनेकांचा श्वास कोंडला होता. येथे चेंगराचेंगरीही झाली. अनेकांना जखमा झाल्या. काही जणांना तर श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे या लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले.  अशा प्रकारे अनेकांना हा विजयाचा जल्लोष त्रासदायक ठरला.

ज्या ठिकाणी ट्रोल झाला, तेथेच ‘हार्दिक’वर कौतुकाचा वर्षाव; ‘वानखेडे’त चाहत्यांचं वेगळं रुप

29 जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला. या विजयानंतर भारतीय संघ काल भारतात परतला. मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियम असा रोड शो टीम इंडियाने केला. भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम ते मरीन ड्राईव्हपर्यंत मोठी गर्दी जमली होती.

मरीन ड्राइव्हवर काही क्रिकेट चाहते जखमी झाले तर काहींना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यामुळे जखमी झालेल्या क्रिकेट चाहत्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांना दवाखान्यात दाखल करावं लागलं त्यातील काहींना फ्रॅक्चर झाले होते. तसेच काही जणांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यातील आठ जणांना काही वेळानंतर घरी सोडण्यात आलं.

रुग्णवाहिकेला दिली वाट

एवढ्या मोठ्या गर्दीतून एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. मरीन ड्राइव्हवर जमलेल्या क्रिकेट चाहत्यांनी प्रचंड गर्दीतून एका ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर एवढ्या मोठ्या गर्दीमधून अॅम्ब्युलन्सला जाण्याासाठी काही सेकंदात रस्ता मोकळा करून दिल्यामुळं अनेकांकडून कौतुकही करण्यात येत आहे.

Team India : विजयाचा जल्लोष, वानखडे स्टेडियममध्ये टीम इंडियाने धरला ढोल ताशावर ठेका, पाहा व्हिडिओ..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज