Download App

Ram Shinde : आमच्या घरात काय चाललंय ते पाहण्यापेक्षा स्वतःच पाहा…राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला

  • Written By: Last Updated:

Ram Shinde : येत्या काळात अगोदर लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणूक (Elections) होणार आहे. त्या अनुषंगाने राजकीय नेत्यांकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहे. त्यामध्ये महायुतीतील घटक पक्ष आगामी निवडणुका या भाजप पक्षाचे चिन्हावर लढवाव्यात संजय राऊत आणि रोहित पवार पवार यांनी केली होती. त्यावर आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी खोटक टोला लगावला आहे.

नगरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असता राम शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आगामी निवडणुका महायुतीतील घटक पक्ष हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील. अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावर शिंदे यांना विचारण्यात आले असता शिंदे यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला.

जलसंधारण विभागात नोकरीची संधी, जलसंधारण अधिकारी पदांच्या 670 जागांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

शिंदे म्हणाले, संजय राऊत जितेंद्र आव्हाड रोहित पवार यांनी आपल्या पक्षावर ती लक्ष देणे तसेच पक्ष मोठा करण्यावरती लक्ष द्यावे. आम्ही कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार का लढवणार महायुतीमध्ये अतिशय चांगलं चाललेलं असून हे त्यांना सहन होईना म्हणून हे बिनबिडाचे आरोप करण्याचा नहाड त्यांनी घातलेला आहे. त्यांना आमच्या घरात काय चाललंय हे डोकं पाहण्यापेक्षा स्वतःच्या घरात काय चाललं ते कसं सुचित होईल हे पाहिलं तर बरं होईल अशा शब्दात राम शिंदे यांनी रोहित पवारांसह संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

लोकसभेच्या उमेदवारांच्या यादीचा मुहूर्त ठरला! भाजप ‘या’ दिवशी यादी जाहीर करणार

कर्जत एमआयडीसी वर बोलताना राम शिंदे म्हणाले की तो प्रस्ताव सदोष होता त्या प्रकल्पाला गावकऱ्यांनी देखील विरोध केला तसेच ती जमीन विवादातील होती बसवणाऱ्या अशा निरव मोदीची ती जमीन होती तसेच वनविभागाने देखील अडचण होती तसेच इको सेन्सिटिव्ह झोन देखील होती अनेक अडचणी त्या जमिनीबाबत असल्याचा प्रस्ताव प्राप्त झाला. त्यामुळे नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून टीम ही कर्जत तालुक्यात गेली असून त्यांच्याकडून चाचणी केली जात आहे.

मोठी बातमी! हायकोर्टाचा मराठा समाजाला दिलासा, EWS मधून नियुक्त्या मिळण्याचा मार्ग मोकळा

तसेच पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले की याबाबत मी एक प्रशासकीय बैठक देखील घेतलेली आहे. याबाबतचा अहवाल तयार करण्यात यावा असे निर्देश मी दिलेले होते त्या अनुषंगाने आजच त्या टीमने सहा क जागांची पाहणी केली आहे. त्यामुळे लवकरच शासनाकडे आराखडा पाठवला जाईल अशी माहिती यावेळी राम शिंदे यांनी दिली.

Tags

follow us