लोकसभेच्या उमेदवारांच्या यादीचा मुहूर्त ठरला! भाजप ‘या’ दिवशी यादी जाहीर करणार

लोकसभेच्या उमेदवारांच्या यादीचा मुहूर्त ठरला! भाजप ‘या’ दिवशी यादी जाहीर करणार

Loksabha Election : संपूर्ण देशाचं लक्ष सध्या येत्या 22 जानेवारीला होणाऱ्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेकडे (Ram mandir ayodhya) लागलेलं असतानाच आता भाजपकडून (BJP) एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. प्रभू रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. सध्या दिल्लीत भाजप कार्यकारिणीची बैठक सुरु असून या बैठकीला भाजपचे सर्वच राज्यांचे प्रमुख उपस्थित आहेत. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) साडेपाच वाजता संबोधित करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभेच्या उमेदवारांच्या यादीचा मुहूर्त ठरला! भाजप ‘या’ दिवशी यादी जाहीर करणार

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आता जोरदार पाऊलं उचलण्यात सुरुवात झाली आहे. भाजपने सध्या देशभरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी भक्तीमय वातावरण तयार केलं असून या सोहळ्यासाठी भाजपकडून देशातील विरोधकांसह अनेकांना आमंत्रित केलं आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक सोहळा अविस्मरणीय ठरणार असल्याचं बोललं जात आहे.

शिवसेनेच्या शिलेदाराविरोधात तटकरे, भाजपची मोर्चेबांधणी : कोंडी फोडण्याचे CM शिंदेंपुढे आव्हान

येत्या 22 जानेवारील उत्तर प्रदेशातील अयोध्येत प्रभु रामलल्ला यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेनंतर देशभरात एक वेगळंच वातावरण तयार होणार आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच निवडणुका जाहीर होणार आहेत. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर देशभरात जे वातावरण तयार होईल त्याचा आगामी निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

काश्मिरमध्ये जवानांची कत्तल अन् सरकार उत्सवात मग्न; लाज काढत राऊतांनी काढले वाभाडे

भाजप जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही यादी प्रसिद्ध करणार आहे. महिनाभरात ही यादी जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दिल्लीत सध्या भाजपची बैठक सुरु असून बैठकीला सर्वच राज्यांचे प्रमुख दिल्लीत दाखल झालेले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचाच बोलबाला झाला पाहिजेत, जणू अशी रणनीतीच आखण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करताना काय बोलणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube