जलसंधारण विभागात नोकरीची संधी, जलसंधारण अधिकारी पदांच्या 670 जागांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

  • Written By: Published:
जलसंधारण विभागात नोकरीची संधी, जलसंधारण अधिकारी पदांच्या 670 जागांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

Jalsandharan Vibhag Bharti 2024 : नोकरीच्या (Job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाने बंपर भरतीची जाहिरात रू काढली आहे. मृद व जलसंधारण विभागांतर्गत (Jalsandharan Vibhag ) सुमारे 670 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती अंतर्गत जलसंधारण अधिकाऱ्यांची पदे भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मृद व जलसंधारण विभाग भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊ.

मुख्यमंत्र्यांना टॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरमधला फरकही कळत नाही; आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

एकूण रिक्त पदे- 670

पदाचे नाव – जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब.

शैक्षणिक पात्रता –
उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्ष कालावधीची सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा पदवी प्राप्त केलेली असावी

वय श्रेणी –
खुला प्रवर्ग – 18 ते 35 वर्षे.
मागासवर्गीय – 5 वर्षांची सूट.

भरतीसाठी अर्ज शुल्क –
खुला/ओबीसी प्रवर्ग – रु 1000.
मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल/अनाथ/दिव्यांगासाठी – रु. 900.

नोकरीचे ठिकाण – भारतभर कुठेही.

ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरूवात – 21 डिसेंबर 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2024

U-Turn ते शहर लखोत, 2023 मधला पर्यंतची प्रियांशू पैन्युलीचा प्रवास, पाहा फोटो… 

अधिकृत संकेतस्थळ –
https://swcd.maharashtra.gov.in/

जाहिरात
https://drive.google.com/file/d/1pO7VruynKcxwlEpZXRuQX02TiH7ZVOX7/view?pli=1

निवड प्रक्रिया-
या पदांसाठी मराठी-इंग्रजी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमदेवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमदेवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पध्दत –
या पदभरतीसाठीचे अर्ज फक्त ऑनलाईन पध्तीने स्विकारले जातील.
त्यासाठी पात्र उमदेवारांनी वर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.
विहीत कालावधीत उमदेवारांनी अर्ज करावा.
विहित पध्दतीने ऑनलाईन अर्ज केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी अर्ज विचारात घेतल्या जाणार नाही.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरात वाचावी. त्यानंतरच अर्ज करावा. कारण, चुकीच्या पध्दतीन अर्ज भरल्यास अर्ज नाकारल्या जाईल.

आवश्यक कागदपत्रे-
एसएसीसी प्रमाणपत्र
वयाचा पुरावा
सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा
वैध नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र
दिव्यांग व्यक्ती असल्यास पुरावा
खेळाडूसाठीच्या आरक्षणसाठी पात्र असल्याचा पुरावा
अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्यचाा पुरावा

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube