Download App

Ahmednagar Festival : रेडा ठरतोय ‘अहमदनगर महोत्सव – २०२३’ चे आकर्षण

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : जिल्हा परिषदेचे साईज्योती बचतगटांचे प्रदर्शन आजपासून न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू झाले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते पार पडले. या प्रदर्शनात कृषी महोत्सव व पशू प्रदर्शन यांचाही यंदा समावेश करण्यात आला आहे.

१२ कोटींचा रेडा

मात्र हरियाणा येथील दारा नावाचा १२ कोटी रुपयांचा रेडा हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरत आहे. जगातील सर्वाधिक उंचीचा व तीन वेळा राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेला हा रेडा आहे. ५ फूट १० इंच एवढी दाराची उंची आहे आणि तीन वर्षे वय आहे. १०० किलो वजनाचा हा रेडा हरियाणातून विशेष ट्रकने तीन दिवसांत नगरला आणण्यात आला आहे. या रेड्याला आणण्यासाठी काही लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

अदानींना आणखी एक झटका! मूडीजनेही बदलला मूड; ‘या’ कंपन्यांना टाकलं ‘निगेटिव्ह’ श्रेणीत 

सकाळी चार वाजल्यापासून या रेड्याचा दिनक्रम सुरू होत असल्याचे रेड्याच्या मालकाकडून सांगण्यात आलं आहे. या प्रदर्शनात एकूण ५७० स्टॉल लावण्यात आले आहेत. हे प्रदर्शन सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत खुले असणार आहे.

Tags

follow us