अदानींना आणखी एक झटका! मूडीजनेही बदलला मूड; ‘या’ कंपन्यांना टाकलं ‘निगेटिव्ह’ श्रेणीत

  • Written By: Published:
अदानींना आणखी एक झटका! मूडीजनेही बदलला मूड; ‘या’ कंपन्यांना टाकलं ‘निगेटिव्ह’ श्रेणीत

मुंबई: अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च इन्वेस्टिगेटीव अँड रिपोर्टिंग संस्थेच्या अहवालानंतर भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना मोठा धक्का बसला आहे. हिंडेनबर्ग संस्थेचा अहवाल (Report of the Hindenburg Institute) २४ जानेवारीला प्रसिद्ध झाला होता. तेव्हापासून गौतम अदानींच्या संपत्तीतमध्ये मोठी घट झाली आहे. दरम्यान, आता भांडवली बाजारात प्रचंड नुकसान सोसावे लागलेल्या अदानी समूहातील कंपन्याचे समभाग आता सावरताना असतांनाच आता मूडीज (Moody’s या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने अदानींना दणका दिला आहे.

उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल समोर आल्यापासून समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये झपाट्याने घसरण झाली आहे. आता यामुळे मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने (Moody’s Investors Service) समूहातील ४ कंपन्यांचे रेटिंग आउटलुक कमी केले आहे.

ज्या अदानी समूहाच्या कंपन्यांचे रेटिंग आउटलुक आता मूडीजने ‘निगेटिव्ह’ केले आहे त्यांचे रेटिंग आउटलुक पूर्वी ‘स्टेबल’ होते. यावर मूडीजचे म्हणणे आहे की, हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात फसवणूक आणि हेराफेरीचे आरोप झाल्यानंतर समूह कंपन्यांच्या बाजार मूल्यांकनात मोठी घसरण झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

या चार कंपन्यांचा आउटलुक निगेटिव्ह’
निगेटिव्ह’ आउटलुक असलेल्या चार कंपन्या अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ग्रीन एनर्जी प्रतिबंधित ग्रुप , अदानी ट्रान्समिशन स्टेप-वन आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई आहेत. मूडीजने सांगितले की, अदानी पोर्ट्स, अदानी इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल, अदानी ग्रीन एनर्जी रिस्ट्रिक्टेड ग्रुप आणि अदानी ट्रान्समिशन रिस्ट्रिक्टेड ग्रुप 1 या अदानी ग्रुपच्या चार कंपन्या आहेत ज्यांचा आउटलुक स्टेबल ठेवण्यात आला आहे.

अदानी ग्रुपचे शेअर्स आजही घसरले आहेत
आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी अदानी ग्रुपच्या शेअर्समध्येही घसरण झाली आहे. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स आज 4.15 टक्क्यांनी घसरून बंद झाले. अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन आणि अदानी टोटलचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये बंद झाले. अदानी विल्मार आणि एनडीटीव्हीचे शेअर्सही घसरले. त्याच वेळी अदानी पोर्टचे शेअर्स किंचित वाढीसह बंद झाले आहे.

Amol Kolhe : मी स्टार प्रचारक, हे आत्ताच कळलं 

दरम्यान, मूडीजने कंपन्यांचे रेटिंग घटवल्याने शेअर बाजारात अदानी समूहाला पुन्हा एकदा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ही पडझड रोखण्यासाठी अदानी समूहाकडून काय पावले उचलण्यात येणार, हे पाहावे लागेल.

एका रिपोर्टनुसार, गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने हिंडेनबर्गशी कायदेशीर लढाई लढण्यासाठी अमेरिकन लॉ फर्म वचटेलची (Wachtell) निवड केली आहे. ही फर्म जगातील प्रसिद्ध फर्म असून, वादग्रस्त प्रकरणांमध्ये कायदेशीर लढाईसाठीही सर्वात जास्त चर्चेत असते. हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर गुंतवणूकदारांना पुन्हा समूहाकडे वळवण्याच्या दिशेने अदानींनी उचललेले हे मोठे पाऊल आहे. त्यामुळे आगामी काळात हा कायदेशीर लढा देखील चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube