Reservation : राज्यात आरक्षणाचा ( reservation) मुद्दा दिवसेंदिवस चांगलाच तापला आहे. यातच मराठा आरक्षणसाठी उपोषण आंदोलने सुरु असताना आता नाभिक समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी एकटावला आहे. यातच अहमदनगर शहरात नाभिक समाज गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण करत आहे. आरक्षणासाठी आज सलून दुकाने बंद ठेवण्यात आली आहे.
Hindi Diwas : गुगल ते जपान जगभरात वाजतोय हिंदीचा डंका! ‘या’ गोष्टी ठरल्या विस्तारास कारण
मराठा समाज तसेच धनगर समाज आरक्षणानंतर आता नाभिक समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटला आहे. नाभिक समाजाला आरक्षणासाठी ओबीसीऐवजी अनुसुचित जातीमध्ये (एससी) समावेश करावा, मागणीसाठी नगरमध्ये महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने उपोषण सुरू आहे.
17 दिवसानंतर जरांगेंचं उपोषण मागे; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, ‘या सर्व बाबतीत अतिशय….’
तीन दिवसांपासून उपोषण सुरू…
महाराष्ट्र नाभिक महामंडळ नगर शाखेच्यावतीने संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून तपोवन रोड येथील संत सेना महाराज भवन येथे तीन दिवसांपासून उपोषण सुरू आहे. नाभिक समाजाच्यावतीने शांताराम राऊत, विकास मदने, शिवाजी दळवी, अरुण वाघ, अजय कदम, उमेश शिंदे उपोषणाला बसले आहेत.
दरम्यान आज मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) याचं सुरू असलेलं उपोषण आज अखेर त्यांनी मागे घेतलं. जरांगे पाटील यांनी 17 व्या दिवशी उपोषण सोडलं. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवालीत जाऊन जरांगे यांच्याशी चर्चा केली. माझ्यावर विश्वास ठेव, मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असं आश्वासन सीएम शिंदेंनी जरांगे पाटलांना दिलं. त्यामुळं जास्त आढेवेढे न घेता जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं.