Hindi Diwas : गुगल ते जपान जगभरात वाजतोय हिंदीचा डंका! ‘या’ गोष्टी ठरल्या विस्तारास कारण

Hindi Diwas : गुगल ते जपान जगभरात वाजतोय हिंदीचा डंका!  ‘या’ गोष्टी ठरल्या विस्तारास कारण

Hindi Diwas 2023 : दरवर्षी 14 सप्टेंबर हा हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस विशेषतः हिंदी भाषेचं महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच हिंदी भाषेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. तर आज देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या 75 वर्षांनंतर देशाची राष्ट्रभाषा असणारी हिंदी भाषा जगभारात डंका वाजवत आहे. गुगलपासून जपानपर्यंत अनेक गोष्टी या विस्तारास कारण ठरल्या. कोण-कोणत्या गोष्टी आहेत जाणून घेऊ…

‘केंद्रात अन् राज्यात रामराज्य नाही तर भाजपारुपी रावणराज’; नाना पटोलेंचा घणाघात

गुगलनेही सुधारली हिंदी भाषा :
गुगलने हिंदी भाषेचं महत्त्व ओळखत अनेक बदल केले आहेत. त्यासाठी हिंदीचे प्राध्यापक अशोक चक्रधर आणि प्रख्यात कवि डॉ. कुमार विश्वास यांच्यासह अनेक हिंदी विद्वानांना अमेरिकेत हेडक्वार्टरला बोलावण्यात आलं. हिंदीचं डिजीटायझेशन करण्यात आलं. गेल्या 5 वर्षात हे बदल करण्यात आले आहेत. मात्र अमेरिकन कंपनी असून त्यांनी केलेले बदल कौतुकास्पद होते.

जरांगेंची दिलजमाई तरीही मराठवाडा CM शिंदेंना सोडेना; शनिवारी होणार सत्वपरीक्षा

चित्रपटांमधून हिंदी जगभारात पोहचली :
हिंदीला जगभारात पोहचवण्यात चित्रपटांची महत्त्वाची भूमिका आहे. कारण बॉलिवूडचे चित्रपट जगभरात रिलीज होत आहेत. त्यात आमिर खानचा दंगल तर चीन सारख्या देशामध्ये देखील रिलीज झाला. तसेच गदर 2 आणि शाहरूखा जवान यांची जागतिक स्तरावर टक्कर होत आहे. सुरूवातीला अमिकाभा बच्चन यांच्यामुळे अमेरिकेत हिंदी माहिती होती. तर आजच्या घडीला आमिर, सलमान शाहरूखमुळे हिंदी चीन-जपान पर्यंत पोहचली आहे.

Global Spa Award: ग्लोबलस्पा अवॉर्ड्स 2023च्या रेड कार्पेटवर सेलिब्रिटीची मांदियाळी

जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा :
हिंदी ही जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा आहे. 602 मिलियनहून अधिक लोक हिंदी बोलतात तर पहिलं स्थान इंग्लिश आणि दुसरं स्थान हे चीनीचं आहे. तसेच अनेक देशांमध्ये हिंदी बोलणाऱ्यांचं प्रमाण वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक भारतीय देखील परदेशातही हिंदी बोलण्यास प्राधान्य देताना दिसून येतात.

Satara : तणाव निवळला, तीन दिवसांनंतर सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा सुरू

नेपाळनेही मानला हिंदीला राष्ट्रभाषा :
हिंदीचे विद्वान प्राध्यापक रवींद्रनाथ श्रीवास्तव उर्फ परिचय दास यांच्या माहितीनुसार नेपाळने हिंदीला राष्ट्रीय भाषा म्हणून मान्याता दिली आहे. अवधी आणि भोजपूरी देखील येथे प्रामुख्याने वापरल्या जातात. फिजीमध्ये शाळा कॉलेजांमध्ये देखील हिंदी शिकवलं जात. त्याचबरोबर फिजी, गुआना, सुरीनाम, टोबैगो आणि त्रिनिदाद अरब अमिरातीमध्ये हिंदीला अल्पसंख्याक भाषेचा दर्जा आहे.

Pune News : 2 हजारांसाठी आई-वडिलांनी पोटच्या मुलीला भीक मागण्यासाठी विकलं…</a>

175 देशांमध्ये हिंदीचे प्रशिक्षण केंद्र :
जगातील 175 देशांमध्ये हिंदीचे प्रशिक्षण केंद्र आहेत. 180 हून अधिक विद्यापीठांमध्ये हिंदी अभ्यासाक्रम आहेत. एकट्या अमेरिकेतील 100 हून अधिक शाळा, कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये हिंदी शिकवलं जात. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, दक्षिण अफ्रीका, नेपाळ, मॉरीशस, न्यूझीलंड, सिंगापूर, यमन, युगांडामध्ये 2 कोटींहून अधिक लोक हिंदी बोलतात.

परदेशात हिंदीची लोकप्रियता आणि संस्कृतीचा परिणाम :
पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, भूतान, म्यांमार, श्रीलंका, मालदीव या देशांमध्ये हिंदीला विशष स्थान आहे. कारण तेथे बहुसंख्य हिंदी भाषिक लेक आहेत. तर इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, चीन, मंगोलिया, कोरिया, जापान सारख्या देशांमध्ये लोकांवर भारतीय संस्कृतीचा प्रभाव असल्याने तेथे हिंदीचाही प्रभाव आहे. अमेरिका, आस्ट्रेलिया, कॅनडा, यूरोप सारखे देश हिंदीला आधुनिक भाषा मानतात. तर खाड़ी देश अफगानिस्तान, कतार, मिस्र, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उज्बेकिस्तानमध्येही हिंदीचा प्रभाव आहे.

दक्षिण भारतात वाढली हिंदी भाषिकांची संख्या :
2011 च्या जनगणनेनुसार तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये हिंदी भाषिकांची संख्या वाढली आहे. देशात 53 कोटी लोक हिंदी बोलतात. दुसरं स्थान बंगाली आणि तिसरं स्थान मराठीचं आहे. आता ही संख्या वाढली असेल. त्यामुळे हे सगळे हिंदी भाषा जगभराात पोहचली असल्याचे पुरावे आहेत.

Tags