‘केंद्रात अन् राज्यात रामराज्य नाही तर भाजपारुपी रावणराज’; नाना पटोलेंचा घणाघात

‘केंद्रात अन् राज्यात रामराज्य नाही तर भाजपारुपी रावणराज’; नाना पटोलेंचा घणाघात

केंद्रात अन् राज्यात रामराज्य नाहीतर भाजपारुपी रावणराज असल्याचा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. भंडारा जिल्ह्यात काँग्रेसच्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध मुद्द्यांवरुन नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे.

Global Spa Award: ग्लोबलस्पा अवॉर्ड्स 2023च्या रेड कार्पेटवर सेलिब्रिटीची मांदियाळी

नाना पटोले म्हणाले, भाजपने रामराज्याचं आश्वासन दिलं होतं, हे रामराज्य आहे की रावणराज? हे रावणराज्यच असून रावणाने सीतामातेचं अपहरण केलं तोही उद्ध्वस्त झाला, द्रोपदीचे वस्त्रहरण करणारे कौरवही उद्ध्वस्त झाले असून ज्यांनी महिलांवर अत्याचार केलेत त्यांचं हेच होणार, भाजपचंही तेच होणार असल्याचंही नाना पटोले म्हणाले आहेत.

सगळ्यांना वेठीस धरणारा जरांगे कोण? दिल्लीकरांना पडलेल्या प्रश्नाचा शिंदेंनी सांगितला किस्सा

तसेच उंचावणाऱ्या महिला खेळाडूंवर अत्याचार करणारा भाजपाचा खासदार ताठ मानेने फिरत आहे, त्याच्यावर कारवाई केली जात नाही. महाराष्ट्रातून 7 हजार महिला-मुली गायब झाल्यात त्याची पोलिस स्टेशनमध्ये नोंदही नाही. सावित्रीबाईच्या राज्यातून महिला व मुली गायब होत आहेत हे दुर्दैवी असल्याची टीकाही नाना पटोले यांनी यावेळी केली आहे.

Jawan Box Collection: किंग खानचा बॉक्स ऑफिसवर जलवा; ७ दिवसात केली एवढी कमाई

पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल :
देशात जीएसटीमुळे सर्वांचेच नूकसान झाले असून केंद्र सरकारने सर्व वस्तूंवर जीएसटी लावला आहे, हा कर गोळा करुन मोदींनी मित्रांचे 16 लाख कोटींचे कर्ज माफ केले आहेत, तसेच मोदींनी याआधी एक घोषणाही केली होती.

“सब को मिलेगा घर, घर में होगा नल और नल में होगा जल” पण तसे झाले का? सगळ्यांना घरे मिळाली का? मोदींनी खोटे बोलून पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असल्याचंही नाना पटोले म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube