जरांगेंची दिलजमाई तरीही मराठवाडा CM शिंदेंना सोडेना; शनिवारी होणार सत्वपरीक्षा

  • Written By: Published:
जरांगेंची दिलजमाई तरीही मराठवाडा CM शिंदेंना सोडेना; शनिवारी होणार सत्वपरीक्षा

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी गेल्या 17 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काहीसे यश आले आहे. मात्र, जरांगेंसोबतच्या या दिलजमाईनंतरही मराठवाड्यातील जनता आणि तेथील प्रश्न काही केल्या शिंदेंची पाठ सोडयला तयार नसून, येत्या शनिवारी (दि.16) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सत्वपरिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

ठाकरे गटाने कागदपत्र दिली नाहीत! शिंदे गटाच्या आक्षेपानंतर अपात्रतेच्या खटल्यात पुन्हा तारखांचा खेळ

येत्या 16 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडणार आहे. तर, 17 रोजी शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यक्रमांदरम्यान विविध संघटनांनी अर्ज केले आहेत. यात 73 आंदोलने, 18 आत्मदहन, 8 मोर्चो, उपोषणाचे 5 अर्ज तर, तीन अर्ज धरणे आंदोलन करण्यासाठी प्रशासनाला देण्यात आली आहेत. यामुळे शहरातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सगळ्यांना वेठीस धरणारा जरांगे कोण? दिल्लीकरांना पडलेल्या प्रश्नाचा शिंदेंनी सांगितला किस्सा

शिंदे आणि मंत्रिमंडळावर मोर्च्यांचे सावट

तब्बल सात वर्षांनी मराठवाड्यात मंत्री मंडळाची बैठक होत आहे. गेल्यावाळी तत्कालीन मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक बोलावली होती. त्यावेळी मोर्चेकरी शिक्षक आणि पोलिसात झालेल्या वादानंतर पोलिसांनी शिक्षकांवर लाठीचार्ज केला होता. यामुळे शहरातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याशिवाय मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देण्यासह आदर्श, मलकापूर, अजिंठा बँकेत अडकलेले पैसे परत मिळावे, मुस्लिम, ओबीसी व धनगर समाजाला आरक्षण मिळावे, मराठवाड्याच्या सिंचनाच्या अनुशेषाबद्दलची नाराजी यासह दुष्काळ मागणी, नोकरभरती, पदोन्नती व इतर मागण्यांसाठी विविध संघटना या काळात मोर्चा काढणार आहेत. त्यासाठी प्रशासनाकडे 73 आंदोलने, 18 आत्मदहन, 8 मोर्चो, उपोषणाचे 5 अर्ज तर, तीन अर्ज धरणे आंदोलन करण्यासाठी देण्यात आले आहे.

Maratha Reservation : ‘आरक्षणाचा जसा खेळखंडोबाच मांडलायं’; मनोज जरांगे पाटील चिडले

शहरात असणार चोख बंदोबस्त

शहरात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. एक सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेला लाठीमाराच्या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, मराठवाड्यासह राज्यभरातून मोठा पोलीस फौजफाटा बोलावण्यात आला आहे. याशिवाय राखीव दलाच्या कंपन्याही तैनात केल्या जाणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सामोर जाण्यासाठी तब्बल 8 हजार आश्रू धुराच्या नळकांड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube