Download App

नगरमध्ये संभाजी भिडेंच्या प्रतिमेला मारले जोडे; पुढील कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी

Sambhaji Bhide : समाजात द्वेष पसरविण्याच्या उद्देशाने बेताल वक्तव्य करणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर राज्य शासनाने त्वरित कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे तसेच सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मयूर वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सावता परिषद अहमदनगरच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जाहीर निषेध नोंदवत भिडेंच्या प्रतिमेस जोडे मारुन निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर संभाजी भिडेंच्या पुढील कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणीही यावेळी सावता परिषदेमार्फत करण्यात आली.(sambhaji bhide poster on slapped in Ahmednagar savata parishad Prohibition nikhil shelar)

PM मोदींपर्यंत दुःख पोहचविण्यासाठी मणिपूरच्या नागरिकांची धडपड; पुण्यातही केली निदर्शन

यावेळी सावता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष निखिल शेलार, जिल्हाध्यक्ष सुदाम लोंढे, अशोक तुपे, शहराध्यक्ष प्रवीण जाधव, दत्ताजी जाधव, जिल्हा महासचिव सागर चौरे, भिंगार शहराध्यक्ष गणेश पांढरे, पृथ्वी कोल्हे, प्रवीण व्यवहारे, मुकेश झोडगे, नीलेश रसाळ, रवींद्र ताठे, किरण शेलार, समीर लोंढे आदी उपस्थित होते.

‘मंत्रीपद नसल्याने हा माणूस बिथरला’; ठाकरे गटाचा नेता शिरसाटांवर भडकला

सावता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष निखिल शेलार यांनी संभाजी भिडेंवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले की, शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी मागील आठवड्यात काही कारण नसताना आपल्या देशातील महापुरुष महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी अत्यंत निंदनीय प्रकारचे वक्तव्य केले.

तसेच सर्व धर्मियांचे व देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबांबद्दल अत्यंत नास्तिक पद्धतीची भाषा वापरुन बेताल वक्तव्य केले आहे. त्यांचे वक्तव्य संपूर्ण समाजाला काळीमा फासणारे आहे.

महिलांबद्दल देखील त्यांना आदर नाही. अनेकदा बेताल वक्तव्य करुन ते समाजात अशांतता पसरविण्याचे काम करत असल्याचे जिल्हाध्यक्ष निखिल शेलार यानी स्पष्ट केले आहे. भिडे यांच्या वक्तव्याने समाजात द्वेष पसरत असून, त्यांना मोकळीक मिळत असल्याने बेछुटपणे वादग्रस्त विधान करण्यात येत आहे.

भिडे हे महाराष्ट्रात समाजामध्ये दोष निर्माण करत असल्याची भावना व्यक्त केली. तर भिडे यांच्यावर त्वरीत अटक करुन त्यांच्या पुढील कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी सावता परिषदेच्यावतीने करुन जाहीर निषेध नोंदविण्यात आला.

Tags

follow us