Download App

नरेंद्र फिरोदिया यांनी कला-संस्कृतीला न्याय दिलाय, संजय बनसोडे यांचे गौरवोद्गार

Sanjay Bansode : नगरमध्ये गेल्या अकरा वर्षांपासून भव्य-दिव्य अहमदनगर महाकरंडक (Ahmednagar Mahakarandak)स्पर्धा घेऊन राज्यातील (Maharashtra)कला संस्कृतीला न्याय देण्याचे काम महाकरंडक स्पर्धेचे आयोजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) हे करत आहेत, असे गौरवोद्गार क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode)यांनी काढले आहे.

सोशल मीडियाच्या जगात लाईव्ह मनोरंजन अन् रंगमंचाचे महत्त्व नव्या पिढीला पटवून देणे गरजेचे – नरेंद्र फिरोदिया

बनसोडे यांनी शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन आणि महावीर प्रतिष्ठाण आयोजित अहमदनगर महाकरंडक स्पर्धेला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप आणि अहमदनगर महाकरंडकचे आयोजक नरेंद्र फिरोदिया हे उपस्थित होते.

बच्चू कडूही जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार; म्हणाले, ‘सरकार म्हणून माझी भूमिका संपली…’

संजय बनसोडे म्हणाले की, अहमदनगरमधील काही तज्ज्ञमंडळी सातत्यानं सांगत आहेत की, फिरोदिया यांचे नाव या महाकरंडकला दिले पाहिजे असे अनेकांनी सुचवले पण नरेंद्र फिरोदिया यांनी ते मान्य केले नाही.

कसल्याही परिस्थितीत या स्पर्धेला माझ्या कुटुंबाचं नाव द्यायचं नाही, असे नरेंद्र फिरोदिया यांनी सांगत अहमदनगर शहराचे नाव दिले. त्यामुळे मी नरेंद्र फिरोदिया आणि महावीर प्रतिष्ठाणच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे देशाला महासत्तेकडे घेऊन चालले आहेत, तसे नरेंद्र फिरोदिया आणि आमदार संग्राम जगताप हे अहमदनगरला विकासाच्या महासत्तेकडे घेऊन जाण्याचे काम ते करत आहेत. एवढे चांगले काम त्यांच्या हातून होत आहे, असेही मंत्री बनसोडे म्हणाले.

आपण जेव्हा हे नाटक पाहिलं, सास्कृतिक कार्यक्रम पाहिला. त्यामुळे सरकारचे देखील डोळे उघडले आहेत. शिक्षणाला किती महत्व आहे? शिक्षण माणसाला कुठं घेऊन जातं? याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला एका नाटकातून मिळाले. आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून नाटक सादर करण्यासाठी आलेल्या कलाकारांना यावेळी मंत्री बनसोडे यांनी शुभेच्छा दिल्या.

follow us