Satyajeet Tambe Demand for change in Mukhyamantri Baliraja Mofat Veej Yojana: : राज्यात आज महायुती सरकारचा अर्थसंकल्प सादर (Mahrashtra Budget 2025) झालाय. अजित पवार यांनी कृषी, उद्योग क्षेत्रासाठी विविध घोषणा केल्या. त्यामध्ये सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत शेतकऱ्यांसाठी अगोदरच सुरू असलेल्या एका योजनेसाठी महत्त्वाची मागणी केली आहे. त्यात राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४’ ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज दिली जाते. मात्र, सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत या योजनेच्या निकषांमध्ये बदल करून १५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांनाही मोफत वीज देण्याची मागणी केली आहे.
धनंजय मुंडे 302 च्या गुन्ह्यात आले नाही तर सरकार…, संतोष देशमुख प्रकरणात जरांगे भडकले
राज्यातील ५०% पेक्षा जास्त शेतकरी हे ७.५ हॉर्स पॉवर पेक्षा जास्त क्षमतेचे शेतीपंप वापरणारे आहेत. या शेतकऱ्यांना देखील मोफत वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४’ च्या निकषात बदल करून १५ अश्वशक्ती करणे आवश्यक असल्याचे आमदार तांबे यांनी सांगितले.
भारत अन् बलुचिस्तानला चीनच्या प्रोजेक्टचा धोका; अपहरणकर्त्यांच्या रडारवर होता ‘सीपेक’?
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंप वापरणाऱ्यांना शेतकऱ्यांना वीज मोफत दिली जाते. राज्यातील ४४ लाख ३ हजार शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाते.
नागरी सुविधांचे तीन तेरा वाजले; मंत्री विखेंनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना झापलं, दिल्या महत्वाच्या सुचना
ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम शेती क्षेत्रावर झाल्यानं त्याचा फटका शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. विविध संकटामुळं अडचणीत सापडलेल्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज देण्यासाठी “मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-२०२४” राबवली जाते.