Download App

Sharad Pawar गटाला मोठा धक्का! अंतर्गत गटबाजीला कंटाळून ‘या’ नेत्याने ठोकला रामराम

Sharad Pawar NCP Dhule : अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करून भाजपसोबत सत्तेत सामील झाले आहेत. त्यानंतर पक्षामध्ये शरद पवार आणि अजित पवार असे गट पडले आहेत. त्यात अनेक ठिकाणी स्थानिक कर्यकर्ते आणि नेत्यांची कोंडी झाली आहे. त्यात आता उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून एका नेत्याने पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सोपविला आहे. (Sharad Pawar NCP group shocked Dhule District Vice President Anil Gote Resinge )

मृतांच्या नावे लाभार्थी, 9 लाख जणांचा एकच मोबाईल नंबर; आयुष्मान भारत योजनेत मोठा भ्रष्टाचार?

धुळे शहराचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीला पुनश्च हरिओम म्हणत राम राम ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षश्रेष्ठींकडे आधीच आपला राजीनामा सोपविला असून सध्यातरी कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे अनिल गोटे यांनी स्पष्ट केले आहे.

माकडासारख्या चाली आणि करामती…, ओमराजे निंबाळकरांवर बोलताना तानाजी सावंतांची जीभ घसरली !

त्यांनी धुळे शहरामध्ये पत्रकार परिषद घेत ही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, त्यांची गेल्या काही काळापासून पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीमुळे त्यांची घुसमट होत होती. यापूर्वी देखील अनिल गोटे यांनी वेळोवेळी पक्षश्रेष्ठींच्या जाहीर कार्यक्रमात देखील पक्षांतर्गत होत असलेल्या गटबाजी बाबत उघड उघड नाराजी व्यक्त केली होती आणि त्यामुळेच पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत असल्याचे म्हणत गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. याबाबत पक्षप्रमुख शरद पवार यांना देखील याबाबतची कल्पना दिली असल्याचे गोटे यांनी स्पष्ट केले आहे.

मात्र त्यांनी शरद पवार गटाचा राजीनामा देत असताना आपण अजित पवार गट किंवा इतर कोणत्या पक्षात जात आहोत? याबद्दल त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. तर ते त्यांच्या स्वतःच्या लोकसंग्राम या पक्षात असणार आहेत. तथा शिवसेना ठाकरे गटाकडून काही प्रस्ताव आल्यास विचार करू आणि आपण महाविकास आघाडी पक्षाचा घटक म्हणून भाजपा विरोधात आपली भूमिका असणार असल्याचे वक्तव्य देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी केले.

follow us