माकडासारख्या चाली आणि करामती…, ओमराजे निंबाळकरांवर बोलताना तानाजी सावंतांची जीभ घसरली !

माकडासारख्या चाली आणि करामती…, ओमराजे निंबाळकरांवर बोलताना तानाजी सावंतांची जीभ घसरली !

Tanaji Sawant on Omraje Nimbalkar : शिवेसेनेत फूट पडल्यापासून आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे कायम धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. आताही ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यावर तानाजी सावंत यांनी जोरदार टीका केली. एका कार्यक्रमात बोलताना सावंत यांची जीभ घसरली. ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून यायचीही तुमची औकात नव्हती, अशा खालच्या शब्दात सावंत यांनी ओमराजे निंबाळकरांवर टीका केली. (Tanaji Sawant slips his tongue while criticizing Omraje Nimbalkar)

आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे सध्या धाराशिवच्या लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. कळंब येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करतांना सावंत यांचा तोल गेला. यावेळी ओमराजेंचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, बरी गेली दोन वर्ष यांची…. माकडासारख्या चाली आणि करामती… ग्रामपंचायत निवडणुकीत तुमची निवडून यायची औकात  नव्हती. फार खालच्या भाषेत मला बोलायचं नाही. पण, बापानं बापाचं काम केलं आणि पालकांनी पालकाचं कामं केल, असं सावंत म्हणाले.

वेगळ्या विदर्भासाठी फडणवीसांच्या घरावर लॉग मार्च, आक्रमक विदर्भवाद्यांना ताब्यात घेतलं 

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीत तुमची निवडणून यायची औकात नव्हती असं तानाजी सावंत यांनी ओमराजेंबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं सावंत हे चर्चेत आले आहेत. सावंत यांनी विरोधी पक्षाच्या खासदारवर शेलकी टीका केल्यानं आता ठाकरे गटाकडून सावंत यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान, तानाजी सावंत यांनी केलेल्या टीकेवर आता ओमराजे निंबाळकर नेमकी काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube