Download App

निलेश लंकेंच्या इंग्रजीतून शपथविधीवर पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले विखेंना…

Sharad Pawar यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत खासदारकीची शपथ घेतली. त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar on Nilesh Lanke answerd Sujay Vikhe Oath in English : आज ( दि.25) नव्या संसद भवनात नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार निलेश लंकेंनी (Nilesh Lanke) फाडफाड इंग्रजीत खासदारकीची शपथ (Oath in English) घेतली. त्यावरून चांगलीच चर्चा सुरू आहे. त्यात आता स्वतः शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. लंकेंनी विखेंना उत्तर दिल्याचा आनंद असल्याचं पवार म्हणाले.

पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरण : मृत मुलांच्या पालकांना 10 लाखांची मदत, शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन

पवार म्हणाले की, संसदेमध्ये बोलल्या गेलेल्या प्रत्येक भाषेचे भाषांतर केलं जातं. त्यामुळे तुम्ही तिथे तुमच्या मातृभाषेत देखील बोलू शकता. तसेच एखादी जनमानसात काम करणारी व्यक्ती देशाच्या संसदेत जात असेल. तर तिच्या भाषेवरून प्रश्न उपस्थित करणं शहाणपणाचे लक्षण नाही. तसेच निलेश लंके यांनी विखेंना इंग्रजीतून शपथ घेत व्यवस्थित उत्तर दिला आहे याचा आम्हाला आनंद आहे.

झालं गेलं सोडा, ओबीसी-मराठा बांधवांनी पटवून घ्यावं; हाकेंच्या आंदोलनानंतर जरांगेंचा पवित्रा

काय आहे नेमकं प्रकरणं?

लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज लढतील पैकी एक लढत म्हणजे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील लंके विरुद्ध विखे. त्यात विखे आणि लंके यांच्यामध्ये प्रचारादरम्यान एकमेकांवर विविध आरोप आणि टीका करण्यात आली. त्यात विखेंनी लंकेंना इंग्लिश येत नसल्यावर टोला लगावला होता. त्यावर आता लंके यांनी खासदार म्हणून पहिल्यांदाच दिल्लीत गेल्यानंतर ‘ज्याला जी भाषा समजते त्याला त्या भाषेत उत्तर देणार’ असं म्हणत विखेंनाआव्हान दिलं होते. त्यानंतर आज लंकेंनी संसद भवनात फाडफाड इंद्रजीत खासदारकीचे शपथ घेत विखेंना त्यांच्याच भाषेत जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे.

शपथ घेतल्यानंतर हात जोडले अन्…

सभागृहात खासदारांचा शपथविधी होत असताना निलेश लंके यांचे नाव पुकारले. तेव्हा निलेश लंके यांनी चक्क इंग्रजीतून शपथेला सुरुवात केली त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर लंके यांनी शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि रामकृष्ण हरी म्हणत हात जोडले. सध्या त्यांची ही शपथ राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे.

follow us

वेब स्टोरीज