झालं गेलं सोडा, ओबीसी-मराठा बांधवांनी पटवून घ्यावं; हाकेंच्या आंदोलनानंतर जरांगेंचा पवित्रा

झालं गेलं सोडा, ओबीसी-मराठा बांधवांनी पटवून घ्यावं; हाकेंच्या आंदोलनानंतर जरांगेंचा पवित्रा

Manoj Jarange Patil : झालं गेलं सोडा, आता ओबीसी आणि मराठा बांधवांनी गाव पातळीवर एकमेकांशी पटवून घ्याव, असं आवाहन मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) मराठा (Maratha) आणि ओबीसी बांधवांना (OBC) केलं आहे. दरम्यान, राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन घमासान सुरु असल्याची परिस्थिती आहे. अशातच आता मनोज जरांगे यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच पत्रकार परिषद घेत आवाहन केलंयं.

जरांगेंची मागणी इनलॉजिकल, त्यांचा सल्लागार कोण? कळतच नाही, लक्ष्मण हाकेंनी वाभाडेच काढले

मनोज जरांगे म्हणाले, मराठ्यांकडे हैद्राबादच निजामकालीन गॅझेट आहे. ओबीसी बांधवांनी कोणाचं ऐकून काहीही करु नये, ओबीसी आणि मराठा बांधवांनी पटवून घेतलं पाहिजे. शेवटी आमचासुद्धा नाईलाज आहे. तुम्ही एक गोष्ट केली की हे दुप्पट करतील हे सुरुच राहणार आहे. आम्ही माघार घेणार नाही, तुम्ही घेणार नाही पण तुम्हाला खरं मान्य करावं लागणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय.

ओठांना लिपस्टिक अन् हातात बांगड्या; पोलीसही हैराण, आत्महत्येपूर्वी अधिकारी का बनला महिला?

तसेच मराठा बांधवांचं हैद्राबादचं निजामकालीन गॅझेट आणि सरकारी नोंदी तुम्ही रद्द करा म्हणू शकत नाहीत. असं म्हणलं की मराठा बांधवांना राग येणारच पण तुम्हाला सांगतो, ओबीसी आरक्षणाच्या यादीत 83 क्रमांकावर मराठा आणि कुणबीची नोंद आहे. तुम्हाला त्याला विरोध करीत आहात. ही तुमची कोणती भूमिका आहे? मराठ्यांसोबत आंदोलनात कोणी नसले तरीही आंदोलन सुरुच राहणार असल्याचंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय.

मोठी बातमी! ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीत लातूरचे धागेदोरे दिल्लीपर्यंत, मुख्याध्यापकास पोलीस कोठडी

दरम्यान, मी जातीसाठी प्रचंड अपमान सहन केलायं,. झालं गेलं सोडून द्या एकमेकांकडे वेगळ्या नजरेने पाहु नका, उद्यापासून राज्यातील सर्वच गावातील ओबीसी आणि मराठा समाजबांधवांनी प्रेमाने वागा. छगन भुजबळांना राज्यात दंगली पेटवायच्या आहेत, तुम्ही तसं होऊ देऊ नका, याचा गोरगरीब मराठे आणि ओबीसी समाजबांधवांना त्रास होणार असल्याचंही जरांगे यांनी आवाहन केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज