शेवगाव: जास्त कष्ट न करता झटपट पैसे मिळावेत अशी अनेकांची सुप्त इच्छा असते. त्यामुळेच अनेकजण शेअर बाजारात (stock market) गुंतवणूक करतात. पण दिवसेंदिवस यात फसवणूक होण्याचे प्रकार वाढले. आताही शेवगाव (Shevgaon) तालुक्यात चांगला परतावा देण्याचं आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा प्रकार घडला. दुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवून वैभव ज्ञानेश्वर कोकाटेने (Vaibhav Dnyaneshwar Kokate) अनेकांची फसवूक केली.
वंचित भाजपची बी टीम म्हणणाऱ्या तुषार गांधींना आंबेडकरांचं सडेतोड उत्तर, ‘राजकीय ज्ञान नसेल…’
याबाबत अधित माहिती अशी की, तालुक्यातील लाडजळगाव येथील वैभव ज्ञानेश्वर कोकाटे याने जास्त व्याजाचे आमिष दाखवल्याने शेवगाव तालुक्यातील अनेकांनी शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला होता. मात्र, गुंतवणूकदारांना मोबदला न देता त्याने आपल्या ठेवीदारांना गंडा घातल्याचा प्रकार घडला. कोकाटे आपले बाडबिस्तरा गुंडाळून मध्यरात्रीच कुटुंबासह पसार झाला. आपली फसवणुक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यामुळे संतप्त झालेल्या ठेवीदारांनी त्याच्या ऑफिसची तोडफोड केली.
लीड देणाऱ्या तालुक्याला 5 कोटींचा निधी देणार; धनंजय महाडिकांचे मतदारांना प्रलोभन
दरम्यान, शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटचा धंदा तेजीत चालू आहे. अनेकांनी आपल्या जवळचे सोने, नाणे विकून व बँकेत ठेवलेले पैसे काढून तर काही हातावर पोट भरणाऱ्या महिलांनी वैभव कोकाटेकडे जास्त व्याजापोटी गुंतवणूक केली होती. मात्र, आपली फसवूक झाल्याच समजल्यानं गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली.
याबाबत बोलतांना भाऊसाहेब बरडे यांनी सांगितले की, वैभव हा ट्रेडिंग करत हता. त्याने जादा परतव्याचा आमिष दाखवल्यानं अख्खं गावाने त्याच्याकडे पैसा गुंतवला होता. त्याने चार दोनदा परतावा दिला. मात्र, पैसे द्यायला टाळाटाळ करायचा. दहा तारखेपर्यंत पैसे परतो, असं त्याने सांगितलं. मात्र, आमच्या कष्टाचा पैसे घेऊन पळून गेला.
तर काही गुंतवणूक करणाऱ्या महिलांना सांगितल की, आमची घरची परिस्थिती नसतांना चार पैसे मिळतील म्हणून आम्ही गुंतवणूक केली. कुणी धुणी-भांडी करू, कुणी शेतात कष्ट करून हाताशी आलेले पैसे गुंतवले होते. गावातील लोकांनी चार-पाच कोटी रुपये गुंतवले होते. तर काही बाहेरच्या लोकांनीही पैसे गुंतवले होते. जवळपास सगळे तीस-पस्तीस कोटी रुपये लोकांनी गुंतवले होते. मात्र, आमची फसगत झाल्याचं महिलांनी सांगितलं.