वंचित भाजपची बी टीम म्हणणाऱ्या तुषार गांधींना आंबेडकरांचं सडेतोड उत्तर, ‘राजकीय ज्ञान नसेल…’
Prakash Ambedkar On Tushar Gandhi : महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी स्वतंत्रपणे उमेदवारही घोषित केले. त्यनंतर आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याचं तुषार गांधी म्हणाले. या टीकेला आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) प्रत्युत्तर दिलं.
लीड देणाऱ्या तालुक्याला 5 कोटींचा निधी देणार; धनंजय महाडिकांचे मतदारांना प्रलोभन
प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या X हँडलवर एक पोस्ट लिहली. त्यात ते म्हणाले, तुम्ही अलिकडे केलेले विधान अत्यंत चुकीचे, कोणताही आधार नसलेले आणि वंचित बहुजनांच्या राजाकारणात अडथला निर्माण करणारे आहेत. पण, संसदीय लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठीच्या प्रयत्नांना तसेच वर्ग, जात, धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वसमावेशक राजकारणाला नाकारणारे आहे, अशी टीका केली.
Dear @TusharG,
Your recent statement is not only highly exclusionary and problematic but it also negates parliamentary democracy and one’s strive for independent political leadership, which are not captive of class, caste and religion.
Your grandfather’s movement against the…
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) April 12, 2024
आंबेडकर म्हणाले की, तुमच्या आजोबांची इंग्रजांविरुद्धची चळवळ व्यापक होती, पण तुमचे विचार आणि राजकारणात तितकी स्पष्टता दिसत नाही. महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीशी कसा व्यवहार केला हे माहीत नाही का? त्यांचे राजकारण किती अलिप्त आहे हे तुम्हाला माहीत नाही का? महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये झालेल्या कराराची माहिती नाही का? अशी कानउघाडणी आंबेडकरांनी केली.
नकली शिवसेना असायला काय ती तुमची डिग्री आहे का? ठाकरेंचा मोदी, शाहांवर जोरदार पलटवार
ते म्हणाले, जर तुमच्याकडे राजकीय ज्ञान आणि समज नसेल तर निरर्थक बोलण्यात आणि बिनबुडाचे आरोप करण्यात वेळ वाया घालवू नका. काळच सत्य उघड करेल. खरंतर आताच सगळे संकते दिसत आहे. पण, निराधार, संदर्भहीन विधाने करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका, असं आंबेडकरांनी सुनावलं.
तुषार गांधी काय म्हणाले?
आगामी लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. यात मतांचे विभाजन करण्याचे काम वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम करत आहेत. हे दोन्ही पक्ष भाजपची बी टीम आहेत. त्यांच्याविरोधात अधिकाधिकक प्रचार करून त्यांना मतदान न करण्याचे आवाहन तुषार गांधींनी केलं.