नकली शिवसेना असायला काय ती तुमची डिग्री आहे का? ठाकरेंचा मोदी, शाहांवर जोरदार पलटवार

  • Written By: Published:
नकली शिवसेना असायला काय ती तुमची डिग्री आहे का? ठाकरेंचा मोदी, शाहांवर जोरदार पलटवार

Uddhav Thackeray Palghar Sabha : लोकसभा निवडणुकीसाठीच्या (Loksabha Election) सभेत आता जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी चंद्रपूर, तर गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेडमधील प्रचार सभेत उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणाला साधला. अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंचा शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी नकली सेना असल्याचे म्हटले आहे. त्याला आता पालघर येथील सभेतून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांनावर ठाकरेंनी टीकास्त्र सोडले आहे.

गद्दाराचे दोन मालक महाराष्ट्रात फिरत आहेत. ते आमच्यावर टीका करत आहेत. मोदी तुम्ही महाराष्ट्रात येऊन शिवसेनेला नकली म्हणता आहात. नकली शिवसेना असायला काय ती तुमची डिग्री आहे का ? त्यांचे दुसरे खंडणीखोर अमित शाहा हे शिवसेनेला नकली म्हणत आहेत. भाजप भेकड, भ्रष्ट पक्ष आहे, अशी टीका ठाकरे यांनी केलीय.

पुण्यात शिक्षिकेची विद्यार्थ्याला मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालकांची पोलिसांत तक्रार

ठाकरे म्हणाले, 2019 च्या निवडणुकीला नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्यासाठी आम्ही पालघरमध्ये प्रचार केला. मोदींना कठीण काळात साथ देणाऱ्या शिवसेनेला मुळासकट संपविण्याचे भाषा केली आहे. नकली सेना म्हणून तुम्ही आमची टिंगल, टवाळी करत आहात. पण अमित शाह तुमच्या गाडीमध्ये अस्सल भाजपवाले किती बसले ते बघा. सगळ्या स्टेपण्या आतमध्ये बसल्या आहेत. म्हणून मी तुम्हाला भाडखाऊ म्हणतो. कारण यांचे स्वतःचे कुणीच नाही. याला फोड, त्याला फोड असे ते करत आहेत.

Lok Sabha Election दरम्यान युती-आघाडींचे आरोप-प्रत्यारोप; भाजपच्या जाहिरातींवरून थोरातांचा हल्लाबोल

तिकडे शेपूट घालता
प्रत्येक सभेत उद्धव ठाकरेंचा उद्धार केल्याशिवाय तुमची भाषणे संपत नाहीत. अमित शाह तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात. तुम्ही तिकडे चीनला उत्तर दिले पाहिजे. चीन अरुणाचल प्रदेश, लेह लडाख भागात घुसखोरी करत आहे. तिकडे उत्तर देण्याएेवटी शेपूट घालत आहात. इकडे उद्धव ठाकरेंना संपविण्याची भाषा करत आहे. तिकडे शेपट्या घालून बसता, असा प्रहार उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube