राजू शेट्टी’मातोश्री’वर; महाविकास आघाडीसोबत जाणार? शेट्टींनी क्लिअर केलं

राजू शेट्टी’मातोश्री’वर; महाविकास आघाडीसोबत जाणार? शेट्टींनी क्लिअर केलं

Raju Shetty : आगामी लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या असतानाच आता राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी आज थेट मातोश्रीला धडक दिली आहे. मातोश्रीवर जात राजू शेट्टींनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी होती? महाविकास आघाडीसोबत युती करणार का? याबाबत राजू शेट्टी यांनी क्लिअर केलं आहे.

14 महिन्यांनंतर रोहित शर्माचे टी-20 मध्ये पुनरागमन? अशी होणार भारत-अफगाणिस्तान सीरीज

राजू शेट्टी म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यासोबतची भेट ही राजकीय नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घेतली आहे. सध्यातरी स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत जाणार नसून स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा जागा स्वतंत्र लढणार असल्याचं राजू शेट्टी यांनी ठणकावून सांगितलं आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत महाविकास आघाडीकडून स्पष्टीकरण मिळणार नाही तोवर कुठलाही विचार करणार नसल्याचं राजू शेट्टी यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं आहे.

शिक्षण MBA पण, मूर्ती कलेतच शोधलं करिअर; मंदिर गर्भगृहासाठी मूर्ती कोरणारे अरुण योगीराज कोण ?

आगामी लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर रिंगणात उतरणार असल्याचं शेट्टी यांनी पुन्हा एकदा सांगून टाकलं आहे. तसेच राज्यातील कोल्हापूर, सांगली, माढा, बुलढाणा, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानीचे उमेदवार स्वबळावर लढणार असल्याचं राजू शेट्टींनी सांगितलं आहे. त्यानूसार मतदारसंघात काम सुरु असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

‘म्हणजे पाचशे वर्षांनंतर मनुवाद..,’; राम मंदिरावरुन काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

उद्धव ठाकरेंसोबत काय चर्चा?
उद्धव ठाकरे यांचा अदानी उद्योग समूहाविरोधात लढा सुरु असून अदानींमुळे शेतकऱ्यांनाही त्रास होत आहे. आयात होणाऱ्या खाद्यतेलावर 5 टक्के आयात शुल्क कमी केलं आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळत नाही. दोन हजार साली सोयाबीनला चार हजारांचा भाव होता. मात्र, आता 24 वर्षांनतरही तेवढाच आहे. केंद्र सरकारने अदानींच्या प्रेमापोटीच आयात शुल्क वाढवल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या प्रश्नावर राजू शेट्टी मराठवाड्यात दौरा सुरु करणार असून उद्धव ठाकरेंची अदानींविरोधातली लढाई ही शेतकऱ्यांचीही लढाई असल्याचं शेट्टींनी सांगितलं आहे. कोल्हापुरातील टीएमसीच्या पाडगावच्या धरणाचं पाणी वापरुन अदानी समूह 8400 कोटी खर्चून सिंधुदुर्गात 2100 मेगावॅटची वीज निर्मिती करणार आहे. त्यामुळे जनतेला पाणी कमी पडणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

संजय राऊत काय म्हणाले?
स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी यांची भूमिका स्वतंत्र असून ते हुकुमशाहीच्या विरोधात फोर्स म्हणून महाविकास आघाडीसोबत येणार आहेत. ते इंडिया आघाडीतही आमच्यासोबत असणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube