शिक्षण MBA पण, मूर्ती कलेतच शोधलं करिअर; मंदिर गर्भगृहासाठी मूर्ती कोरणारे अरुण योगीराज कोण ?

शिक्षण MBA पण, मूर्ती कलेतच शोधलं करिअर; मंदिर गर्भगृहासाठी मूर्ती कोरणारे अरुण योगीराज कोण ?

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir) सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी होणार आहे. या मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठी कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज (Arun Yogiraj ) यांनी तयार केलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल असे सांगण्यात येत आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी ही माहिती दिली. मूर्ती तयार करण्यासाठी तीन शिल्पकारांची निवड करण्यात आली होती. अरुण योगीराज या तीन शिल्पकारांत होते. यानंतर अरुण योगीराज यांनीही प्रतिक्रिया दिली. मला खूप आनंद होत आहे की ज्या तीन शिल्पकारांची निवड करण्यात आली त्यात माझं नाव होतं. अरुण योगीराज नेमके कोण आहेत हे आज आपण जाणून घेऊ.

अरुण योगीराज कर्नाटकातील मैसुरू येथील रहिवासी आहेत. योगीराज यांच्या कुटुंबात मागील पाच पिढ्यांपासून मू्र्ती तयार करण्याचं काम केलं जात आहे. देशातील प्रसिद्ध मूर्तीकारांत त्यांचा समावेश होतो. देशातील अनेक राज्यांतून योगीराज यांनी तयार केलेल्या मूर्तींना मोठी मागणी असते. पीएम मोदी यांनीही योगीराज यांच्या कलेचं कौतुक केलं आहे.

श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा उत्सव होणार? 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी द्या : भाजपची मागणी

एमबीए केलं, नोकरीही केली पण मूर्तीकलेतच शोधलं करिअर 

अरुण योगीराज यांचे वडिलही उत्तम दर्जाचे शिल्पकार आहेत. अरुण योगीराज लहानपणापासूनच या कामात आहेत. एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ खासगी कंपनीत काम केलं होतं. मात्र, त्यांचं मन तिथं फार काळ रमलं नाही. त्यानंतर थोड्याच दिवसांत नोकरी सोडली. 2008 पासून मूर्तिकलेतच करिअरची सुरुवात केली.

इंडिया गेट येथे आज जी 30 फूट उंच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची मूर्ती दिसत आहे ती मूर्ती अरुण यांनीच तयार केली आहे. नेताजी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त इंडिया गेट परिसरात त्यांची भव्य मूर्ती बसवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांची ही इच्छा योगीराज यांनी पूर्ण केली. अरुण योगीराज यांनी केदारनाथ येथे आदि शंकराचार्य यांची 12 फूट उंच मूर्ती तयार केली होती. मैसुरू जिल्ह्यातील चुंचनकट्टे येथे 21 फूट उंच हनुमानाची प्रतिमा, स्वामी रामकृष्ण परमहंस यांची प्रतिमा, नंदीची सहा फूट उंच अखंड मूर्ती अशा अनेक मूर्ती तयार करून त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे.

राम मंदिर लोकार्पणदिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडं मागणी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube