इथेनॉल निर्मितीवरील बंदीमुळे राजू शेट्टी आक्रमक; शेलक्या शब्दात सरकावर बरसले

  • Written By: Published:
इथेनॉल निर्मितीवरील बंदीमुळे राजू शेट्टी आक्रमक; शेलक्या शब्दात सरकावर बरसले

नवी दिल्लीः साखरेचे दर (Sugar Price) नियंत्रणात ठेवण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादनासाठी बंदी (Ethanol Production) घातली आहे. यासंदर्भातील अधिसूचना सरकारने गुरुवारी जारी केली. अन्न आणि पुरवठा मंत्रालयाने सर्व साखर कारखानदार आणि डिस्टिलरीजना इथेनॉलचे उत्पादन ताबडतोब बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु आता साखर कारखान्यांकडून याबाबत नाराजी व्यक्त होऊ लागली आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. सरकारचा हा निर्णय तुघलकी असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.

शिकला होता तर तुरुंगात कशाला गेला, माझं शिक्षण नाही तरीही.., मनोज जरांगेंची भुजबळांवर पुन्हा जळजळीत टीका

राजू शेट्टी म्हणाले, इथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च आला आहे. आता अचानक साखरेचे उत्पादन कमी होत असल्याने हे प्रकल्प बंद करण्यास सांगितले आहे. सरकारने इथेनॉल निर्मितीवरील बंदी मागे घ्यावी. सरकारचा हा निर्णय तुघलकी आहे. त्याचा साखर कारखान्यांना बसणार आहे. त्याचा ऊस उत्पादकांनाच फटका बसणार आहे.

‘तो’ शिष्टाचारही भाजपनेही पाळावा; मलिकांवरील फडणवीसांच्या पत्राला अजितदादा गटाचे प्रत्युत्तर

सरकारचा आदेश काय ?
जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 नुसार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग विविध जीवनावश्यक वस्तू, विक्री आणि उपलब्धता यावर लक्ष ठेवत असतो. याच अंतर्गत साखरेची किंमत स्थिर रहावी यासाठी सरकारने 2023-24 या काळात साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरींना साखरेच्या रसापासून इथेनॉल बनवू नये असे आदेश दिले आहेत. हा आदेश तात्काळ लागू होत आहे. परंतु तेल विक्री कंपन्यांकडून सध्या मिळालेल्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी बी-हेवी मोलॅसेसपासून इथेनॉलचा पुरवठा सुरु राहणार आहे.

साखरेचे भाव पडले, शेअर्सला फटका
साखरेपासून इथेनॉल निर्मितीच्या उत्पादनावर बंदी घातल्याची बातमी येताच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे भाव सुमारे 8 टक्क्यांनी घसरलेत. या निर्णयाचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येईल, असे मानले जात आहे. साखर कारखान्यांमध्ये साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता लक्षात घेता भाव खाली येण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे. बलराम चिनी 6.60 टक्के, दालमिया इंडिया 6.08 टक्के, डीसीएम श्रीराम 5.80 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube